नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली सोयाबीन उत्पादकांची लूट

नांदेड : काही शेतकऱ्यांच्या हाती लागलेले सोयाबीन डागील झाले आहे. त्यात आर्द्रतेचे प्रमाण १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे व्यापारी दर पाडून खरेदी करत आहेत.
Looting of soybean growers in the name of humidity in Nanded district
Looting of soybean growers in the name of humidity in Nanded district

नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन उध्वस्त झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या हाती लागलेले सोयाबीन डागील झाले आहे. त्यात आर्द्रतेचे प्रमाण १५ ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे व्यापारी दर पाडून खरेदी करत आहेत.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘एफएक्यू’ निकषानुसार खरेदी व्हावी, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिले. केंद्र सरकारच्या सोयाबीन हमीभाव खरेदी योजनेनुसार, शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार एफएक्यू दर्जाचा माल हमीभावाने खरेदी करणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारच्या हमीभाव खरेदी योजनेनुसार पीएसएस(प्राइज सर्पोट स्कीम) एफएक्यू दर्जाच्या मर्यादेनुसार जास्तीत जास्त सुसह्य मर्यादामध्ये आर्द्रता १२ टक्के. माती व काडी कचरा दोन टक्के, खराब व किडलेले तीन टक्के, अशा सोयाबीनला किमान हमी दर प्रतिक्विंटल तीन हजार ८८० रुपये आहे. 

शासनाचे असे निकष असताना कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी तसेच शेतकऱ्यांकडून सरळ माल खरेदी करणारे ऑइलमिलधारक दहा टक्के आर्द्रतेच्यावर प्रतिटक्क्यांमागे एक किलो सोयाबीन कपात करत आहेत.

खराब व किडलेले दोन किलो पर्यंतच घेत आहेत. त्यावर गेल्यास एक किलो कपात करून घेत आहेत. म्हणजेच प्रतिक्विंटल मागे एकूण तीन किलो जास्तीचे कपात करून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

खरेदी केंद्र त्वरित सुरू करा

हमीभाव योजनेचे एफएक्यू निकष न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करा. तसेच जिल्ह्यातील ऑइल मिल चालकांना शासकीय एफएक्यू निकषानुसार सरळ शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात यावे. जिल्ह्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र त्वरित चालू करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील राजेगोरे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com