कोल्हापुरात महापुरामुळे १२९८ कोटींचे नुकसान

महापुरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आम्ही अव्याहतपणे काम करून पूर्ण केले आहेत. याची आकडेवारी आम्ही शासनाला सादर करीत आहोत. महापुराने तर नुकसान झालेच पण अतिवृष्टीचा दणकाही शेतकऱ्यांना बसला आहे. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर
कोल्हापूर पूर
कोल्हापूर पूर

कोल्हापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात विविध पिकांचे सुमारे १२९८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. ७८१०१ हेक्‍टर क्षेत्राला महापुराचा फटका बसला असल्याची माहिती पंचनाम्यातून पुढे आली. पूर व अतिवृष्टीमुळे उसाचे सर्वाधिक ३९ टक्के नुकसान झाले. जिल्ह्यातील सुमारे ६१९९९ हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले. गेल्या महिन्याच्या कालावधीत बाहेरील जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ वापरून कृषी विभागाने निर्धारित वेळेत पंचनामे केले. जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार शेतकऱ्यांच्या पिकांची या महापुरामुळे हानी झाली आहे.  जिल्ह्यात नागरी वस्तीबरोबरच शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाने तातडीने नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. यानुसार कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यासाठी मोहीम सुरू केली. इतर सर्व कामे बाजूला ठेवून पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक गावात जाऊन पंचनामे करण्यात आले. यातून नुकसानीची आकडेवारी सामोरी आली आहे. केद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून १०५ कोटी रुपयांची मदत यातून मिळू शकेल अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.  राज्याकडून नुकसानीपोटी साडेपाचशे कोटी रुपयांची मदत अपेक्षित आहे. महापूर ओसरल्यानंतर शासनाने तातडीने जीआर काढून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अडीच हेक्‍टरवर असणाऱ्या पिकांचे पीक कर्ज माफ केले होते. अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. पंचनामे करताना अतिवृष्टी व महापूर या दोन्हीमुळे होणारे नुकसान गृहीत धरण्यात आले. यानुसार पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.  ७७,०१८ हेक्‍टरवर पिकांचे नुकसान  महापुरामुळे खरीप पिकांचे ७७,०१८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यंदा ३ लाख ८४ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पिके होती. यापैकी अतिवृष्टीने ७०५१ हेक्‍टर तर पुरामुळे तब्बल ६९९९७५ हेक्‍टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. सरासरी २० टक्के नुकसान खरीप पिकांचे झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com