agriculture news in Marathi, loss of १२९८ crore in Kolhapur due ot flood, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोल्हापुरात महापुरामुळे १२९८ कोटींचे नुकसान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

महापुरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे आम्ही अव्याहतपणे काम करून पूर्ण केले आहेत. याची आकडेवारी आम्ही शासनाला सादर करीत आहोत. महापुराने तर नुकसान झालेच पण अतिवृष्टीचा दणकाही शेतकऱ्यांना बसला आहे. 
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

कोल्हापूर : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात विविध पिकांचे सुमारे १२९८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. ७८१०१ हेक्‍टर क्षेत्राला महापुराचा फटका बसला असल्याची माहिती पंचनाम्यातून पुढे आली. पूर व अतिवृष्टीमुळे उसाचे सर्वाधिक ३९ टक्के नुकसान झाले. जिल्ह्यातील सुमारे ६१९९९ हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले. गेल्या महिन्याच्या कालावधीत बाहेरील जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ वापरून कृषी विभागाने निर्धारित वेळेत पंचनामे केले. जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार शेतकऱ्यांच्या पिकांची या महापुरामुळे हानी झाली आहे. 

जिल्ह्यात नागरी वस्तीबरोबरच शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाने तातडीने नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. यानुसार कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यासाठी मोहीम सुरू केली. इतर सर्व कामे बाजूला ठेवून पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक गावात जाऊन पंचनामे करण्यात आले. यातून नुकसानीची आकडेवारी सामोरी आली आहे. केद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून १०५ कोटी रुपयांची मदत यातून मिळू शकेल अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली. 

राज्याकडून नुकसानीपोटी साडेपाचशे कोटी रुपयांची मदत अपेक्षित आहे. महापूर ओसरल्यानंतर शासनाने तातडीने जीआर काढून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या अडीच हेक्‍टरवर असणाऱ्या पिकांचे पीक कर्ज माफ केले होते. अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. पंचनामे करताना अतिवृष्टी व महापूर या दोन्हीमुळे होणारे नुकसान गृहीत धरण्यात आले. यानुसार पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. 

७७,०१८ हेक्‍टरवर पिकांचे नुकसान 
महापुरामुळे खरीप पिकांचे ७७,०१८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यंदा ३ लाख ८४ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पिके होती. यापैकी अतिवृष्टीने ७०५१ हेक्‍टर तर पुरामुळे तब्बल ६९९९७५ हेक्‍टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. सरासरी २० टक्के नुकसान खरीप पिकांचे झाले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन...औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
फलोत्पादन योजनांमध्ये बदलास केंद्र तयार पुणे: “फलोत्पादनातील उत्पन्नवाढीसाठी सध्याच्या...
शेतीसाठी आवश्‍यक ते सर्वकाही करणार :...माळेगाव, जि. पुणे ः कमी पाणी व कमी जागेत अधिक...
कलिंगड शेती ठरते आहे फायदेशीरअकोला ः मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी पुणे ः राज्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. मध्य...
हमीभावाच्या संदर्भात वायदे बाजारावरही...लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी...
बनावट पावत्यांद्वारे फसवणूक टळणारमुंबई: पीकविमा भरल्याच्या बनावट पावत्या देऊन...
राहुरीतील कृषी विद्यापीठाचा वेतन खर्च...पुणे:राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठांसमोर...
त्रिसदस्यीय समितीमुळेच अवकाळी भरपाईचा...सांगली (प्रतिनिधी) ः राज्य सरकारने अवकाळीने...
कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना...राहुरी विद्यापीठ, जि. नगर: महात्मा फुले कृषी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
‘अटल योजने’द्वारे शाश्‍वत करूया भूजलजल म्हणजेच पाणी अर्थात अमृत. जलाचे वर्गीकरण आपण...
वेध भविष्यातील शेतीचाआपल्या देशात आणि राज्यात सुद्धा आजही बहुतांश...
पीकविम्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची...मुंबई  : रब्बी हंगाम २०१९ साठी विमा कंपनीची...
अठरा हजार टन कांदा आयातनवी दिल्ली : केंद्र सरकारने १८ हजार टन कांदा...
राज्यात थंडीत घट; चक्राकार वाऱ्याच्या...पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि परिसरात तसेच...