बिलोली तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान 

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील अनेक गाव शिवारात शनिवारी (ता.१८) सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या गारपिटीमुळे कलिंगड, आंबा या फळपिकासंह भाजीपाला, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
Loss of crop due to hailstorm in Biloli talukaLoss of crop due to hailstorm in Biloli taluka

बिलोली लुक्यातील चितमोगरा, केरुर, आळंदी, बोरगाव आदी गावांच्या शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास अर्धा तास गारपीट झाली. यामुळे कलिंगड, आंबा, भुईमूग, ज्वारी, विविध भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. मुखेड तसेच लोहा तालुक्यातील माळाकोळीसह काही मंडळांत पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यातील काही भागात हलका पाऊस झाल्याचे वृत्त आहे. 

गारपिटीमुळे आमच्या गावातील दहा ते बारा एकरावरील कलिंगडाचे मोठे  नुकसान झाले. परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले.  - शाम मजगे, चितमोगरा, ता. बिलोली, जि. नांदेड   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com