Agriculture news in marathi The loss of crops in Ratnagiri district was eight crores, and five crores received | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे नुकसान आठ कोटी, मिळाले पाच कोटी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात भातशेतीचे सुमारे आठ कोटींचे नुकसान झाले होते. त्या पोटी पाच कोटी रुपये नुकसान भरपाई वाटपासाठी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. ती प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

रत्नागिरी : क्यार आणि महाचक्रीवादळामुळे जिल्ह्यात भातशेतीचे सुमारे आठ कोटींचे नुकसान झाले होते. त्या पोटी पाच कोटी रुपये नुकसान भरपाई वाटपासाठी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. ती प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

जिल्ह्यात ५४ हजार शेतकऱ्यांचे ११ हजार ८९७ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. आंब्याचेही ००.७० टक्के नुकसान झाले. काजूचे १३२.८ हेक्टर नुकसान आहे. एकूण ९ कोटी २३ लाखांचे नुकसान आहे. राज्यपालांनी भरपाई म्हणून भातशेतीला हेक्टरी ८ हजार रुपये जाहीर केले आहेत. त्यापैकी ५ कोटी जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. जिल्ह्यात भातशेती एकूण ७९ हजार १४६ हेक्टर आहे. त्यापैकी ११ हजार ८९७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ५४ हजार १९७ बाधित शेतकरी असून पंचनामे पूर्ण झाले.

जिल्ह्यात एकूण ११ हजार ८७४ हेक्टर भाताखालील क्षेत्र आहे. तर ४३ हेक्टर नागलीखाली क्षेत्र आहे. त्यात आंब्याचे नुकसान ००.७० टक्के झाले आहे. त्याचे पंचमाने पूर्ण झाले असून जिल्ह्यातील १७२ शेतकऱ्यांचे १३२.८ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. १८ हजार प्रतिहेक्टर प्रमाणे २३ लाख भरपाई दिली जाईल.

पीक विम्याअंतर्गत ११२ शेतकरी पात्र ठरले आहेत. क्यार आणि महाचक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील ३ बोटींचे अंशतः नुकसान झाले. ४ हजार १०० प्रमाणे त्यांना १२ हजार भारपाई मिळणार. त्यात जिल्ह्यातील ७९ बोटींचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ९ हजार ६०० प्रमाणे ७ लाख ५८ हजार ४०० रुपये भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यातील ९४ मच्छीमारांचे १ हजार ४६२ मासेमारी जाळ्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. २ हजार ६०० प्रमाणे त्याचे ३८ लाख २६६ एवढी भारपाई मिळेल.

शिवसेनेकडून आढावा 

जिल्ह्यातील परिस्थितीचा शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आढावा घेतला. ग्रामीण संस्थांचे खावटी कर्ज १ वर्षांसाठी माफ करावे. पीक गेल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकाप्रमाणे सर्वांना वर्षासाठी २ रुपये गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ द्यावेत. पुढील वर्षी शेतीसाठी सरकारने मोफत बियाणे द्यावे, नावीन्य पूर्ण योजनेत तशी तरतूद करावी, नुकसानभरपाई सरसकट मिळावी, खावटी कर्ज वर्षांसाठी माफ करावे, वर्षासाठी दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकाप्रमाणे गहू आणि तांदूळ सर्वांना द्यावे, या मागण्या राज्यपाल किंवा नवीन सरकारकडे करू, असे गिते यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...