Agriculture news in marathi loss of crops, vegetables due to heavy rain in Chakur taluka | Agrowon

चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके, भाजीपाल्याचे नुकसान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व अजनसोंडा शिवारात सोमवारी (ता.६) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये शेतातील उभे पीक व भाजीपाल्यांचे अतोनात नुकसान झाले.

चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व अजनसोंडा शिवारात सोमवारी (ता.६) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये शेतातील उभे पीक व भाजीपाल्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

धनगरवाडी व अजनसोंडा येथील काही प्रगत शेतकरी पारंपारिक पिकासोबतच भाजीपाला पिकाचीही लागवड करतात. ‘कोरोना’मुळे सध्या बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे भाजीपाला शेतातच सडत आहे. त्यातही काही शेतकरी मिळेल त्या दरात व्यापाऱ्यांना व स्वतः ग्राहकापर्यंत जाऊन विक्री करीत आहेत. मात्र, सोमवारी झालेल्या गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. 

धनगरवाडी येथील शेतकरी शेषेराव कोरे यांनी जानेवारी महिन्यात एक एकरवर टोमॅटो लागवड केली होती. त्यासाठी त्यांना साधारण एक लाख रुपयांचा खर्च आला. मंगळवारी (ता.७) ते पहिला तोडा करणार होते. त्यासाठी व्यापाऱ्याला सौदाही केला होता. मात्र, सोमवारी रात्रीच गारपीटने होत्याचे नव्हते केले. तोडणीस आलेले टोमॅटो खराब झाले. झाडे भुईसपाट झाली. आता खर्चही निघेल, अशी आशा राहिली नाही. याशिवाय एक एकरवर मिरचीचेही नुकसान झाले, असे कोरे यांनी सांगितले. 

येथीलच पंडित कोरे यांनी दोन एकर टोमॅटो, दहा गुंठे काकडी, दहा गुंठे कारले, एक एकर भेंडी, लागवड केली आहे. मात्र गारपीटमुळे त्याचे नुकसान झाले. दिवसरात्र एक करून मोठ्या मेहनतीने भाजीपाल्याचे संगोपन केले. मात्र, एका रात्रीतच होत्याचे नव्हते झाले. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे, या आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन मोबदला द्यावा, अशी मागणी धनगरवाडी व अजनसोंडा येथील शेतकऱ्यांनी केली. 
 


इतर ताज्या घडामोडी
पीककर्ज द्या, वीजबिल माफ करा,...सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया...
जालन्यात सव्वा लाख क्विंटलवर कापूस...जालना : जिल्ह्यात कापूस खरेदीची एकूण ८...
औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी...औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात...
पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकचपुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा...
नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे...
मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच...नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर...
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाईसांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला...
भुईबावडा परिसरातील तीन गावांना ...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी)...
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी...रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले...
अकोल्यात कंटेनमेंट झोन वाढणार नाहीत...अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची वाढत...
कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावटकोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७)...
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...
चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर ...चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य...
शेतकऱ्यांना प्रतीक्षा फळपीक विमा...नगरः मृगबहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार...पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच...
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजनमाती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी...
सुधारित तंत्राने करा शेवगा लागवडलागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...