Agriculture news in marathi loss Due to 'nisarga' in Ratnagiri district | Agrowon

‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात दाणादाण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दाणादाण उडवली. सर्वाधिक फटका मंडणगड, दापोलीसह गुहागर तालुक्यांना बसला.

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दाणादाण उडवली. सर्वाधिक फटका मंडणगड, दापोलीसह गुहागर तालुक्यांना बसला. तर, रत्नागिरी, राजापूरमध्ये अनेक ठिकाणी घरांवर झाडे कोसळली. या वादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले; मात्र जिवीतहानी झालेली नाही. किनाऱ्‍यावर उभ्या केलेल्या नौकांचेही मोठे नुकसान झाले. 

हवामान विभागाच्या निरदर्शानुसार पहाटेपासून जिल्हयात निसर्ग वादळाचा परिणाम जाणवू लागला. रात्री हलका वारा आणि पाऊस सुरु होता. मात्र पहाटे पाच वाजल्यापासून वादळाने रौद्ररूप धारण केले. बुधवारी सकाळी त्यात भर पडली.

किनारी भागात त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. वेगवान वाऱ्‍यामुळे झाडे पिळवटून टाकली होती. संगमेश्वर, रत्नागिरीत अनेक ठिकाणी झाडे घरावर पडून नुकसान झाले. महावितरणने अनुचित प्रकार टाळण्यासाठी रात्रीच वीजपुरवठा खंडित केला होता. तो सुरळीत करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी कार्यरत होते. 

दापोली, गुहागर, मंडणगड तालुक्यातील किनारी भागात वादळाने कहर केला. एनडीआरएफची दोन्ही पथके सुरक्षेसाठी तैनात केली आहेत. या तीन तालुक्यातील सुमारे चार हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव मार्गावरील बानखिंड येथे झाड कोसळल्याने शिरगाव च्या दिशेने जाणारा रस्ता बंद झाला आहे, फक्त दुचाकी वाहने जाण्यासाठी जागा आहे. 

चिपळूण परिसरात मध्य रात्रीपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. गव्हे, पंचनदी, आसूद येथील बागायतीमधील पोफळी मोठ्या प्रमाणात मोडल्या. सुपारी बागायतदारांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विविध कंपन्यांच्या मोबाईल सेवा बंद झाल्याने संपर्क यंत्रणा बंद पडली. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने लगतच्या काही घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसले. राजापूर तालुक्यातील जैतापूर बाजारपेठेत भरती आणि वादळामुळे जास्त पाणी घुसले. 

तेरा खलाशांसह जहाज भरकटले 

दापोली दाभोळ मार्गावर असलेले खोके वाऱ्यामुळे रस्त्यावर आले. मिरकरवाडा येथे भल्यामोठ्या २ जहाजांनी आसरा घेतला होता. हे दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला. नांगर तुटल्याने हे जहाज भरकटले. या बार्जमध्ये १३ खलाशी असून त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिकही बचावकार्यात सहभागी झाले आहेत.  

 
 


इतर ताज्या घडामोडी
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...
सापळा पिकांची लागवड महत्त्वाचीएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड...
राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये...नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर...
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापनयवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन...
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
विक्री केंद्रांद्वारे सेंद्रिय भाजीपाला...हिंगोली : ‘‘मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी...
हिंगोलीत व्यापारी, खासगी बॅंकांकडून १५...हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी रविवार (ता....
पैठण तालुक्यात मोकाट जनावरांकडून...औरंगाबाद : शेकडोंच्या संख्येने कळपाने येऊन...