agriculture news in marathi Loss of farmers due to arbitrariness of 'irrigation' | Agrowon

‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे  नुकसान

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील पाझर तलावाकडे पाहणी केली नाही. दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचाच अडचणी वाढल्याने पाटबंधारे विभागावरच गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जायखेडा पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू.

नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील पाझर तलावाकडे पाहणी केली नाही. दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांचाच अडचणी वाढल्याने पाटबंधारे विभागावरच गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जायखेडा पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा रयत क्रांती संघटनेने निवेदनाद्वारे दिला. याबाबत संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्याकडे निवेदन दिले.

गेल्या २५ वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे तळवाडे भामेर येथील पाझर तलावाकडे दुर्लक्ष आहे. तलावाच्या दरवाजांची दुरुस्तीही केलेली नाही. नादुरुस्त मोऱ्या व माती बांधावर मोठमोठी झाडे वाढले आहेत. सध्या तळवाडे भामेर पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असताना तलावातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. शेतकऱ्यांची शेती, विहीर आणि शेतातल्या जनावरांच्या जीविताला मोठा धोका आहे. त्यामुळे या नाल्यात पाणी सोडू नये, अशी विनंती शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.

संघटनेचे जिल्हा सरचिटणीस डोंगर पगार, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ अहिरे, तालुकाध्यक्ष युवराज देवरे, भाऊसाहेब पगार, भिका धोंडगे, हिंमत धोंडगे, संदीप कापडणीस आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप

शेतकऱ्यांची विनंती व भावना लक्षात न घेता पाटबंधारे विभागाने स्वतःची चुक झाकण्यासाठी त्यांच्यावरच पोलिसांकडून गुन्हे दाखल केले. त्यांना अटक झाली. हे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाटबंधारे विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...
अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर...
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा...हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...