लातूरमध्ये शेतक-यांना १५३ कोटींचा फटका

शेतीमाल खरेदी
शेतीमाल खरेदी

लातूर  : शासनाने काही शेतीमालाला हमी भाव ठरवून दिले असले, तरी बाजारात मात्र हमीभावाने शेतमालाची खरेदी होत नाही. हमी भावापेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी दराने खरेदी होत आहे.  जाहिराती करून शासनाने हमी भावाने खरेदी केंद्र सुरू केली असली, तरी ते नावालाच आहेत. या सर्वांचा परिणाम चालू हंगामात जिल्ह्यातील शेतक-यांना १५३ कोटींचा फटका बसला आहे. ही फक्त लातूर आडत बाजाराची परिस्थिती आहे. राज्यातील इतर बाजार समितीच्या आडत बाजारातील हा फटका मोठा आहे.

देशभर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, असे गृहीत धरून हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. पण, शासनाच्या वतीने या मागणीला फाटा देत दर वर्षी हमी भाव जाहीर केले जात आहे. पण, हा भावदेखील बाजारात मिळत नसल्याचे सातत्याने दिसत आहे. शासनाच्या वतीने हमी भावाप्रमाणे खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

चालू हंगामात तर ती केवळ नावालाच असल्याचे दिसत आहे. या केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतक-यांची खरेदी केली जात नाही. बारदाना नाही, गोदाम नाही म्हणून खरेदी केंद्र बंद आहेत. पेमेंट लवकर  मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. या सर्व प्रकारांत बाजारात आपला शेतमाल विकल्याशिवाय शेतक-यांना पर्यायच नाही. यातून सध्या हमी भावापेक्षा एक ते दीड हजार रुपये कमी भावाने शेतमालाची खरेदी होत आहे.

लातूर बाजार समितीच्या आडत बाजारात चालू हंगामात उडीद, तूर, सोयाबीन व मूग या चारच शेतमालाची ४९ लाख क्विंटल खरेदी-विक्री झाली आहे. याची हमी भावाप्रमाणे एक हजार ७२८ कोटी रुपये शेतक-यांना मिळणे अपे.िक्षत होते. पण बाजारात सरासरी भावाप्रमाणे केवळ एक हजार ५७५ कोटी रुपयेच पदरात पडले. यात शेतक-यांना १५३ कोटींचा फटका बसला आहे.

या बाजारात सोयाबीनची ५० रुपये, मुगाची एक हजार ६५, उडदाची एक हजार ३०५ व तुरीची एक हजार ४३० रुपये, हमी भावापेक्षा कमी दराने विक्री झाली आहे.  

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात चालू हंगामातील स्थिती (आकडे कोटीमध्ये)
शेतमाल  आवक  हमीभावाने होणारी रक्कम सरासरी भावाने मिळालेली रक्कम बसलेला फटका
उडीद १,९२,७८९ १०४ ७९ २५
तूर ६,६९,९७१ ३६५ २६९ ९६
सोयाबीन  ३९,२५,४८२ ११९७ ११७७ २०
मूग  १,११,९८५ ६२ ५० १२
एकूण ४९,००,२२७  १७२८ १५७५ १५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com