पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे नुकसान

चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या कालावधीत पुणे विभागात जोरदार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय जनावरे, नागरिक, घरांची पडझड, जनावरांच्या गोठ्यांचे ही नुकसान झाले आहे.
Loss of five lakh hectare crops in Pune division
Loss of five lakh hectare crops in Pune division

पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या कालावधीत पुणे विभागात जोरदार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय जनावरे, नागरिक, घरांची पडझड, जनावरांच्या गोठ्यांचे ही नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

यंदा पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृष्य पाऊस झाल्याने नद्यांना पूरस्थिती तयार झाली होती. यामुळे नद्या दुथडी भरून वाहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने ऊस, कापूस, सोयाबीन, बाजरी, फळबाग, भाजीपाला पिके आडवी झाली होती.

जोरदार पावसामुळे जिरायती व आश्वासित चार लाख ५४ हजार ८४९ हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसल्याने तब्बल तीन लाख २४ हजार ८२४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात ७३ हजार ३१० हेक्टर, सातारा २३ हजार ४९१ हेक्टर, सांगली २६ हजार ५५७ हेक्टर आणि कोल्हापूरमध्ये ६ हजार ३६५ हेक्टरचे नुकसान झाले आहे.  बहुवार्षिक पिकांचे ८४ हजार १८८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. यात सोलापूरमध्ये ७० हजार हेक्टर ६४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात चार हजार ८४८, सातारा ५३१, सांगली ८ हजार १३७ आणि कोल्हापूरमध्ये २६ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली आहे. विभागाच जवळपास ५ हजार ७१२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. यात पुणे जिल्ह्यात ४०४, सोलापूर ५ हजार २४८, सांगली ५५, सातारा ४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे जमिनीवर मातीचा थर जमा झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. ही जमीन पूर्वस्थितीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येणार असल्याची शक्यता आहे. विभागात एक हजार ३५४ हेक्टर जमिनीवर मातीचा थर जमा झाल्याने शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. यात पुणे जिल्ह्यात ५०५, सांगली १०२, सोलापूर ७२२ आणि कोल्हापूरमध्ये २३ हेक्टरवर जमिनीवर मातीचा थर जमा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com