ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
अॅग्रो विशेष
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसान
जळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे पीक हातचे जाण्याची स्थिती आहे. मागील दोन दिवसांत शेतात कापणी करून वाळविण्यासाठी ठेवलेल्या उडदाचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
जळगाव ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे पीक हातचे जाण्याची स्थिती आहे. मागील दोन दिवसांत शेतात कापणी करून वाळविण्यासाठी ठेवलेल्या उडदाचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
मुगाची मळणी सुरू असतानाच पाऊस आला. शेतकऱ्यांनी ही मळणी कशीबशी उरकली. त्यातही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कमी शेंगा लागल्याने यंदा हवी तशी रास मुगासंबंधी मिळालेली नाही. लागलीच मागील पंधरवड्यात उडीद काढणीवर किंवा मळणीवर आला. पण, या महिन्यातील १९ दिवसांमध्ये रोज पावसाने हजेरी लावली आहे. नंदुरबार, धुळे व जळगावात मागील १९ दिवस रोज पाऊस झाला आहे. फक्त धुळे जिल्ह्यात या १९ दिवसांमध्ये दोन दिवस तीन मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे काढणीसाठी हवा तसा वाफसा झालाच नाही. परंतु, पीक जे हाती येईल ते घरात आणण्यासंबंधी अनेक शेतकऱ्यांनी वाफसा नसताना उडदाची कापणी केली.
कापणीनंतर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने हे पीक ८० टक्के वाया गेले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. तर धुळे व नंदुरबारात मिळून २५ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली. यातील ८० टक्के क्षेत्रातील उडदाचे पीक ८० टक्के वाया गेल्याचे सांगितले जात आहे. अतिपावसाने शेंगा काळ्या कसदार जमिनीत हव्या तशा पक्व झाल्या नाहीत. दर्जाही घसरला. मुरमाड, हलक्या जमिनीत काही शेतकऱ्यांनी उडीद कापून लागलीच घरी आणला व शेंगा तोडून त्या घरानजीक कुठेतरी उघड्यावर जेमतेम वाळवून घेतल्या. परंतु, पाच ते सहा एकर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना शेंगा तोडण्याची कसरत करणे, त्यासाठी मजुरी खर्च करणे शक्य नसल्याने त्यांचे पीक शेतातच वाया गेले आहे.
जळगाव जिल्ह्यात अमळनेर, जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा, भडगाव, धरणगाव या भागांत तर धुळ्यात शिंदखेडा, शिरपूर, साक्री, धुळे येथे आणि नंदुरबारात तळोदा, शहादा, नंदुरबार भागांत उडदाची मोठी नासाडी झाली आहे.
आमच्या भागात उडदाचे पीक पुरते वाया गेले आहे. कारण, सतत पाऊस सुरू असल्याने कापणी, मळणी होऊ शकली नाही. पीक शेतातच उभे असून, दाण्यांना कोंब फुटण्याची भीती आहे.
- आधार पाटील, शेतकरी, आजंतीसीम (जि. जळगाव)
- 1 of 656
- ››