Agriculture news in marathi, The loss of four million and 28 lacs of Mahavitaran due to heavy rains in Sindhudurga | Agrowon

सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार कोटी २८ लाखांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. एक हजार १२६ वीजखांब कोसळले आहेत. ६५ रोहित्रांचे यामध्ये नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांत महावितरणचे ४ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. एक हजार १२६ वीजखांब कोसळले आहेत. ६५ रोहित्रांचे यामध्ये नुकसान झाले आहे. गेल्या दहा दिवसांत महावितरणचे ४ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीत वादळीवाऱ्यांसह अतिवृष्टी झाली. तिचा मोठा फटका महावितरण कंपनीला बसला आहे. वादळ आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात वीज वितरणची सेवा पुरती कोलमडून गेली होती. अनेक भागांतील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे जिल्ह्यातील १ हजार १२६ वीजखांब कोसळून पडले. यामध्ये उच्च दाबाचे २९८ आणि लघू वाहिन्यांच्या ९३८ वीज खांबांचा समावेश आहे. 

याशिवाय उच्चदाबाच्या २६.१२ कि.मी अतंरावरील वीजवाहिन्या तुटुन पडल्या. कमी दाबाच्या ८० किलोमीटर अतंरावरील वाहिन्या तुटल्या.

पुराच्या पाण्यामुळे १६ रोहित्रे कोसळली, तर ६५ रोहित्रे नादुरूस्त झाली. सर्वाधिक नुकसान दोडामार्ग, सांवतवाडी, कुडाळ, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात झाले. अतिवृष्टी आणि वादळामुळे महावितरणचे गेल्या दहा दिवसांत ४ कोटी २८ लाख रुपयांचे नुकसान झाले.

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...