Agriculture news in marathi Loss of grape gardens due to hail in Jat taluka | Agrowon

जत तालुक्यात गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

सांगली : जत तालुक्यातील पूर्व बिरुळ, जिरग्याळ या भागात शनिवारी (ता. १८) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसाने बेदाणा ३० ते ४० टक्के भिजला आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. 

सांगली : जत तालुक्यातील पूर्व बिरुळ, जिरग्याळ या भागात शनिवारी (ता. १८) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसाने बेदाणा ३० ते ४० टक्के भिजला आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. 

जत तालुक्याच्या पूर्व भाग हा बेदाणा उत्पादनासाठी अग्रेसर आहे. या भागात १५० हून अधिक बेदाणा शेड आहेत. त्यामुळे द्राक्षाची काढणीचे नियोजन शेतकरी करत आहेत. बेदाणा तयार करण्याची लगबग सुरू आहे. या भागात अजून २० ते २५ टक्के द्राक्षाची काढणी शिल्लक आहे. 

शनिवारी (ता. १८) अचानक सायंकाळी उमदी, बिरुळ, वज्रवाड, जिरग्याळ, तिकुंडी, खिलारवाडी गावात वादळीवाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. त्यानंतर गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या द्राक्षांना त्याचा फटका बसला आहे. यामुळे सुमारे २५० एकरांवरील द्राक्ष बाधित झाली आहेत. बेदाणा भिजल्याने नुकसान झाले असून बेदाणा काळा पडण्याची शक्यता आहे. 

मिरज तालुक्यातील सोनी गावात देखील गारपिट झाली. सध्या सोनी परिसरात आगाप द्राक्षाची खरड छाटणी घेतली होती. द्राक्षाला फुटवा फुटला होता. गारपिट झाल्याने नवीन आलेली पालवी, डोळे गारांच्या माराने बाधित झाल्याने पुन्हा छाटणी घ्यावी लागणार आहे. 

जत पूर्व भागात दोन ते तीन दिवसांतून पाऊस पडत आहेत. रात्रीचा पाऊस येत आहे. त्यामुळे द्राक्ष बाधित झाली आहेच. त्याचबरोबर बेदाणा नुकसान अधिक झाले असून काळा पडू लागला आहे. शासनाने पंचनामे करून मदत करावी. 
- रोहिदास सातपुते, उमदी, ता. जत. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...