नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी ः भुजबळ

नाशिक : ‘‘नुकसानीची पातळी अधिक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. मात्र आता केंद्रानेही मदत केली पाहिजे’’, अशी भूमिका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.
  Loss level more, Center should also help: Bhujbal
Loss level more, Center should also help: Bhujbal

नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली पिके पावसामुळे आडवी झाली आहेत. त्यामुळे पीक पाहणी, पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत जाहीर करता येणार नाही. ती तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात शासनास सूचना करण्यात आल्या आहेत. नुकसानीची पातळी अधिक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. मात्र आता केंद्रानेही मदत केली पाहिजे’’, अशी भूमिका पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

इगतपुरी तालुक्यातील परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी भुजबळ यांनी खंबाळे शिवारात सोमवार (ता.१९) भात पिकांची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी एस. पी. सूर्यवंशी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी एस.आर. तवर, मंडल अधिकारी आर. आर. पाटील आदी उपस्थित होते. 

भुजबळ म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे. शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे राज्य शासनातर्फे प्रस्ताव पाठविला जाईल. त्या अनुषंगाने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’ 

बाधित क्षेत्राची पाहणी झाल्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी बाधित शेतकऱ्यांना दिली. या पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, उपसरपंच दिलीप चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी आदी उपस्थित होते.

राज्य शासन मदत करण्यास प्रयत्नशील

जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करा, जेणे करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लवकरच मदत जाहीर केली जाईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com