Agriculture news in Marathi Loss of milk producers due to slowing demand | Agrowon

पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध उत्पादकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह संचारबंदीच्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीत सूट असली तरीही दुधाची मागणी घटली असून दरही घसरले आहेत. याचा निफाड, दिंडोरी तालुक्यातील दूध उत्पादकांना फटका बसला आहे. दुधाची विक्री कमी झाली आङे. याचा दूध उत्पादकांसह डेअरी चालकांनाही मोठा फटका बसत आहे.

पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह संचारबंदीच्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीत सूट असली तरीही दुधाची मागणी घटली असून दरही घसरले आहेत. याचा निफाड, दिंडोरी तालुक्यातील दूध उत्पादकांना फटका बसला आहे. दुधाची विक्री कमी झाली आङे. याचा दूध उत्पादकांसह डेअरी चालकांनाही मोठा फटका बसत आहे.

निफाड व दिंडोरी तालुक्यात एकीकडे दोन लाख लीटर हुन अधिक दररोज दूध उत्पादन होत असतांना शहरी भागात मागणी कमी झाल्याने हे दूध द्यायचे तरी कोणाला असा प्रश्‍न आहे. डेअरीवर दुधाचे दर कमी झाले आहेत. लॉकडाऊनपूर्वी डेअरीवर म्हशीचा दुधाचा दर ३० रूपये प्रतिलिटर पर्यंत होता. आता मागणी घटल्याने तब्बल दहा रूपयांपर्यत दर घसरले आहे. 

पन्नास हजार लिटर दुधाचे करायचे काय
‘कोरोना’ने दुध व्यवसायालाही जोरदार तडाखा दिला आहे.गुजरातमध्ये निफाड, दिंडोरीतून होणार पुरवठ्यात घट झाली आहे. दुधाचे उपउत्पादन असलेले दही, ताक, लस्सी, आयस्क्रिम हे बंद आहेत. दोन्ही तालुक्यात दररोज दोन लाख पैकी ५० हजार लीटर दूध शिल्लक राहत आहे. शेतकऱ्यांना दररोज १५ लाख रूपयांचा तोटो सहन करावा लागत आहे. 

डेअरी चालकांनाही फटका
एकीकडे दूध उत्पादक त्रस्त असतांना डेअरी चालकांनाही नुकसान सोसावे लागत आहे. दुधाची मागणी घटली असली तरी त्यांच्याकडे रोज दुधाचा रतीब घालणाऱ्या विक्रेत्यांकडून कमी दराने का होईना त्यांना सर्व दूध खरेदी करावे लागत आहे.

दुधाचे उत्पादन भरपूर मात्र मागणी कमी झाल्याने मोठे नुकसान सोसावे लागत आहे. दुधाचा रतीब घालणाऱ्या शेतकऱ्यांकडून दररोज दूध खरेदी करावे लागते आहे.मागणीत घट झाल्याने शिल्लक दुधातून तोटा होत आहे.
- ईश्‍वर बोथरा, बोथरा दूध डेअरी, पिंपळगावं बसवंत


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...