Agriculture news in marathi; Loss of moog manufacturers due to rainy season in Akola | Page 2 ||| Agrowon

अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग उत्पादकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम पाऊस तर कुठे सतत ढगाळ व पावसाळी वातावरण असल्याने काढणीला आलेल्या मूग पिकाचे मोठे नुकसान होत आहे. या भागात मुगाची काढणी सुरू झाली असून वातावरणातील आर्द्रतेमुळे काढलेल्या मुगाला सुकविणेही अनेकांना शक्य झालेले नाही. परिणामी, मुगाच्या दाण्यांचा रंग बदलत असून यामुळे दर्जा खालावत आहे. बाजारपेठांमध्ये या मुगाचे दर कमालीचे खालावले आहेत. सध्या कुठल्याच बाजारपेठेत शासनाने जाहीर केलेले ७०५० रुपये हमीभाव मिळणे कठीण झाले आहे. बाजारपेठेत ३८०० पासून विक्री होत असून सरासरी ४५०० रुपयांच्या आतील दर शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत.

अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम पाऊस तर कुठे सतत ढगाळ व पावसाळी वातावरण असल्याने काढणीला आलेल्या मूग पिकाचे मोठे नुकसान होत आहे. या भागात मुगाची काढणी सुरू झाली असून वातावरणातील आर्द्रतेमुळे काढलेल्या मुगाला सुकविणेही अनेकांना शक्य झालेले नाही. परिणामी, मुगाच्या दाण्यांचा रंग बदलत असून यामुळे दर्जा खालावत आहे. बाजारपेठांमध्ये या मुगाचे दर कमालीचे खालावले आहेत. सध्या कुठल्याच बाजारपेठेत शासनाने जाहीर केलेले ७०५० रुपये हमीभाव मिळणे कठीण झाले आहे. बाजारपेठेत ३८०० पासून विक्री होत असून सरासरी ४५०० रुपयांच्या आतील दर शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत.

या वर्षात जूनमध्ये पाऊस सुरू झाल्याने सुरवातीलाच पेरणी केलेल्या मुगाची काढणी जोरात आहे. अशात गेल्या १५ दिवसांत सतत ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येत असलेल्या पावसामुळे शेतीतील कामे विस्कळित झाली. सध्या मुगाच्या शेंगा तोडणीला आल्या. काही शेतकऱ्यांनी मजुरांकडून तोडणीही केली. काही ठिकाणी यंत्राच्या (हार्वेस्टर) साह्याने काढणी केली जात आहे. परंतु, मुगाच्या शेंगा ओलसर असल्याने त्यातील दाण्यांचा रंग पांढरा होत आहे. शेंगांमधील दाणे फुटूनही नुकसान झेलावे लागत आहे. काढणी केलेल्या मुगाला सुकविण्यासाठी पुरेसे उन्ह देता येत नाही. दाण्यांमधील ओलसरपणामुळे चांगल्या दिसणाऱ्या मुगाचे नुकसान होऊ लागले आहे. सध्या वातावरण टिकून असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

मूग तोडणीच्या अडचणीत वाढ
यावर्षी मुगाचा हंगाम सुरवातीपासूनच अडचणीत आलेला आहे. मध्यतंरी पावसाच्या खंडामुळे शेंगा लागणीच्या काळातच फटका बसला. त्यानंतर ज्या शेंगा लागल्या त्या तोडणीला आलेल्या असताना आता सतत पावसाळी वातावरण आहे. एकाचवेळी शेंगा तोडणीची लगबगही वाढल्याने काही भागांत शेतकऱ्यांना मजुरही उपलब्ध होत नाही. अधिकची मजुरी देऊनही शेंगा तोडणीत अडचणी येत आहेत. मोठे क्षेत्र असलेले शेतकरी यंत्राचा वापर करीत असताना त्यांनाही पावसामुळे एकाच दिवसात काढणी करता येत नाही.

मुगाला हमीभाव    ७०५०
सध्याचा सरासरी दर ४५००
कमीत कमी   ३५००
जास्तीत जास्त  ५८००

 

 

आमच्या भागात (खारपाण पट्ट्यात) मूग काढणी जोरात आहे. मात्र, सततच्या पावसाळी वातावरणामुळे अडचणी आहेत. यंत्राद्वारे मूग काढायचा तर पावसामुळे दिवसभर काम होत नाही. काढलेला मूग सुकविण्यातही अडचणी आहेत. सततच्या आर्द्रतेमुळे मुगाचे दाणे पांढरे झाले आहेत. यामुळे चांगले दर मिळणे कठीण झालेले आहे.
- अनुप साबळे, शेतकरी, तरोडा ता. अकोट जि. अकोला

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...
मराठवाड्यातील ८२४ प्रकल्पांत उपयुक्त...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ पैकी ८२४...
जतला पाणी देण्याचे आश्‍वासन खोटे :...सांगली : जतला कर्नाटकचे पाणी देण्याबाबत...
द्रवरूप जिवाणू संवर्धकांच्या विक्रीतून...नांदेड : कृषी विभागाच्या नांदेड आणि परभणी येथील...
परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यांतील...परभणी : जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ,...
सोलापूर जिल्ह्यात प्रचार शिगेला, शेतकरी...सोलापूर  ः जिल्ह्यातील विधानसभेच्या ११...
महागाई, बेरोजगारीकडे सरकारचे दुर्लक्ष...सोलापूर  : ‘‘महागाई, बेरोजगारी आणि भूकबळी...
पुणे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे धीम्या...पुणे ः निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे पुणे जिल्ह्यातील...
पाथर्डीत राजळे- ढाकणे परिवाराची...नगर ः नगर जिल्ह्यामधील शेवगाव-पाथर्डी विधानसभा...
नगर जिल्ह्यात ७४ गावांमधील पाणी दूषितनगर ः जिल्ह्यातील सुमारे ७४ गावांतील १०२ पाणी...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९९ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे...
देशाची अर्थव्यवस्था धोक्‍यात ः यशवंत...कऱ्हाड, जि. सातारा ः काही दिवसांपूर्वी कोणाला...
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...