Agriculture news in marathi Loss to okra growers in Sirpur due to 'lockdown' | Agrowon

‘लॅाकडाऊन’मुळे सिरपुरातील भेंडी उत्पादकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 एप्रिल 2020

फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रामुळे सिरपूरच्या भेंडीची विदेशात स्वतंत्र ओळख आहे. यंदा निर्यातदारांसोबत बैठक झाली. परंतु, लॅाकडाऊनमुळे निर्यात सुरु होऊ शकली नाही. 
- अमित तुपे, उद्याविद्या विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र, परभणी. 

पाऊस लांबल्यामुळे लागवडीस उशीर झाला. त्यामुळे यंदा निर्यातीसाठी वेळेवर भेंडी उपलब्ध होऊ शकली नाही. 
त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. दर कमी असल्यामुळे नुकसान होत आहे. 
- पशुपतीनाथ शेवटे, सचिव, संतकृपा एक्सपोर्ट शेतकरी गट. 

परभणी : मागील पावसाळ्यात ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबला. त्यामुळे सिरपूर (ता. पालम)येथील निर्यातदार गटातील शेतकऱ्यांना भेंडीची वेळेवर लागवड करता आली नाही. परिणामी, उत्पादनास उशीर झाला. त्यानंतर ‘कोरोना’मुळे लॅाकडाऊन सुरु झाला. त्यामुळे यंदा शेतकरी गटांची भेंडी निर्यात खंडीत झाली. स्थानिक बाजारपेठेतील आवक वाढली, तर दर घसरले. त्यामुळे भेंडी उत्पादकांचे नुकसान होत आहे. 

सिरपूर येथे ‘आत्मा’तंर्गंत संतकृपा शेतकरी बचत गटाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष सुभाष आवरगंड, सचिव पशुपतीनाथ शेवटे यांच्यासह २७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. २०१३ -१४ ते २०१८-१९ या कालावधीत दुष्काळी वर्षांचा अपवाद वगळता या शेतकरी गटातर्फे ३५ ते ९० टन भेंडीची निर्यात संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आदी देशांत करण्यात आली. 

मागील वर्षी ऑगस्ट- सप्टेंबर ते ऑक्टोंबर- नोव्हेंबरपर्यंत सतत पाऊस सुरु होता. त्यामुळे गटातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यात भेंडीची लागवड करता आली. दरवर्षी ऑक्टोंबर अखेरपर्यंत भेंडी निर्यात सुरु होते. परंतु, यंदा नोव्हेंबर अखेरीस लागवड झाली. त्यामुळे जानेवारी अखेरीस भेंडीचे उत्पादन सुरु झाले.

यंदा निर्यातदार बदलण्यात आला. परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रात निर्यादारांसोबत बैठक झाली. परंतु, मार्च महिन्यात राज्यासह देशात कोरोना महामारीमुळे लॅाकडाऊन सुरु झाला. विमानसेवा, देशांर्गंत वाहतूक बंद झाली. त्यामुळे यंदा सिरपूर येथून भेंडीची निर्यात होऊ शकली नाही. 

यंदा या गटातील शेतकऱ्यांनी २० एकरवर भेंडी लागवड केली आहे. सध्या दररोज १५ ते २० क्विंटल भेंडी उत्पादन निघत आहे. निर्यात बंद असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. त्यामुळे भेंडी उत्पादकांचे नुकसान होत आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...