agriculture news in marathi Loss of paddy cultivation in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे पाणथळ भागातील भातशेतीचे नुकसान होत आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे पाणथळ भागातील भातशेतीचे नुकसान होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिळ धरणाजवळील सांडव्या लगतचा डोंगर खचला आहे. त्यामुळे आंबा, काजूच्या ४० हून अधिक झाडांचे, तर मिरजोळे येथे जमीन खचल्यामुळे भात लागवडीखालील जमिनीला भेगा पडल्या आहेत.

जिल्ह्यात बुधवारी (ता. २०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ५३.७०, दापोली ५९.१०, खेड ८३.९०, गुहागर ७५.७०, चिपळूण ९७.५०, संगमेश्वर १२४.९०, रत्नागिरी ९८.२०, लांजा १३१.३०, राजापूर ८४.२० मि.मी नोंद झाली. दोन दिवसांपूर्वी शिळ धरणाच्या सांडव्याजवळील काही भागात भूस्खलन झाडले. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हा भाग धोकादायक ठरण्याची भीती आहे. 

तहसीलदार शशिकांत जाधव, सरपंच संदीप नाचणकर यांच्यासह पोलिस पाटील सोनिया कदम आणि ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. २०) घटनास्थळाची पाहणी केली. सांडव्यापासून दीडशे मीटर अंतरावरील बाजू खचली आहे. तेथील डोंगर खाली येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरवातीला आंब्याची चार झाडे उन्मळून पडली.

आतापर्यंत ३० ते ४० गुंठे भाग खचला आहे. आंबा, काजूच्या ४० कलमांचे नुकसान झाले.  हा भाग असाच कोसळत राहिला, तर डोंगरावरील बागेचे नुकसान होण्याची भीती आहे. मिरजोळे येथे नदीकिनारी पूर्वी खचलेल्या भागाजवळ भेगा पडलेल्या आहेत. तेथे काही शेतकऱ्यांची भात लागवड धोक्यात आहे.
 


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...