जळगाव जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

जळगाव ः खानदेशात पीक नुकसानीचे पंचनामे या आठवड्यात गतीने झाले आहेत. दुर्गम भागातील अपवाद वगळता यंत्रणांनी अनेक भागात पीक पाहणी करून आपला प्राथमिक निष्कर्ष जाहीर केला आहे.
 Loss panchnama in Jalgaon district in final stage
Loss panchnama in Jalgaon district in final stage

जळगाव  ः खानदेशात पीक नुकसानीचे पंचनामे या आठवड्यात गतीने झाले आहेत. दुर्गम भागातील अपवाद वगळता यंत्रणांनी अनेक भागात पीक पाहणी करून आपला प्राथमिक निष्कर्ष जाहीर केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन लाख हेक्टरला अतिपावसाचा फटका बसला आहे. 

पूर्वहंगामी व कोरडवाहू कापूस पिकाला अधिक फटका बसला आहे. ज्वारी, सोयाबीन पिकाचेही नुकसान झाले आहे. यावल, चोपडा भागात ज्वारी व सोयाबीनचे ६० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. तर, पूर्वहंगामी कापसाचेदेखील ७० टक्के नुकसान आहे. जळगाव जिल्ह्यात खरिपातील पिकांची पेरणी ९८ टक्क्यांवर झाली होती. धुळे व नंदुरबारातही पेरणी ९५ टक्क्यांवर झाली होती. जळगाव जिल्ह्यात एकूण सात लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित होती. 

धुळ्यात चार लाख हेक्टर आणि नंदुरबारात पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. परंतु, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिपावसाने  नुकसान झाल्याचे दिसत आहे. ऑगस्टमध्ये सतत १५ दिवस पाऊस होता. यात मुगाचे ८५ टक्के, तर उडदाचे ६५ टक्के नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर उडदाचे आणि १८ हजार हेक्टरवरील मुगाचे नुकसान झाले.

नुकसानीची टक्केवारी सप्टेंबरमध्ये सतत २५ दिवस पाऊस सुरू राहिल्याने वाढली आहे. त्यात पूर्वहंगामी कापूस, ज्वारी व सोयाबीनला फटका बसला. जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यात कापसाचे अधिक नकसान झाले. धुळ्यातही कापूस, मूग, उडीद, ज्वारीची नासाडी झाली आहे. नंदुरबारातही कापूस, सोयाबीन, मूग, उडदाची हानी झाली आहे. 

यावल, चोपड्यात १०० टक्के नुकसान

गेल्या तीन-चार दिवसांत सातपुडा पर्वतालगतच कापणी झालेली ज्वारी, सोयाबीन पिकावर जोरदार पाऊस झाला. यात या पिकांचे १०० टक्के नुकसान यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात झाले. नुकसानीचे पंचनामे दुर्गम भागातच राहिले आहेत. उर्वरित भागात नुकसानीची माहिती व टक्केवारी संकलित करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात याबाबतची माहिती प्रशासन जाहीर करील, अशी माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com