Agriculture news in Marathi, Loss of soyabeans on return rains | Agrowon

नांदेड : परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, वेचणीस आलेल्या कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नायगाव मंडळात सर्वाधिक १५१ मिलिमीटर पाऊस झाला.

नायगाव, नरसी, मांजरम, खानापूर, शहापूर, पेठवडज या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक मंडळांमध्ये रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील कापणी केलेल्या सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले.

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, वेचणीस आलेल्या कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नायगाव मंडळात सर्वाधिक १५१ मिलिमीटर पाऊस झाला.

नायगाव, नरसी, मांजरम, खानापूर, शहापूर, पेठवडज या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक मंडळांमध्ये रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे शेतातील कापणी केलेल्या सोयाबीन पिकामध्ये पाणी साचून नुकसान झाले.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ४१ मंडळांमध्ये हलक्या ते जोरदार पाऊस झाला. नायगावसह धर्माबाद, बिलोली, देगलूर या सीमावर्ती भागातील तालुक्यासह मुखेड, कंधार, लोहा, उमरी तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस झाला. कापणी केलेले सोयाबीन, बोंडातून फुटून वेचणीस आलेला कापूस, खोलगट भागातील जमिनीमध्ये पाणी साचल्याने कपाशी, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. 

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि बनवस मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पाऊस सुरू असल्यामुळे सोयाबीनच्या सुगीच्या कामात अडथळे येत आहेत. रब्बीच्या पेरणी लांबणीवर पडली 
आहे.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) 
नांदेड जिल्हा ः नायगाव १५१, नरसी ९३, मांजरम ७१, बरबडा ५४, कुंटूर ५२, धर्माबाद ४०, जारिकोट ४२, करखेली १७, बिलोली ३५, आदमपूर २७, लोहगाव ६०, सगरोळी ४०, कुंडलवाडी ५५, देगलूर ५८, खानापूर ७५, शहापूर ७०, मरखेल २२, मालेगाव २२, हानेगाव ४५, मुखेड ५८ जांब ४५,  येवती ५०, जाहूर ४२, चांदोला ५२, मुक्रमाबाद २७, बाऱ्हाळी २७, कंधार ४५, कुरुला ३०, उस्माननगर १६, बारुळ ४, पेठवडज ८०, फुलवळ ३८,  लोहा ११, माळाकोळी ९, कलंबर ३५, कापशी १५, सिंदी ६, गोळेगाव २५.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...