साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे नुकसान

साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे नुकसान
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे नुकसान

सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी (ता. ११) महाबळेश्‍वर, सातारा, जावळी, माण, कोरेगाव तालुक्यांत दमदार पाऊस झाला. मुसळधार पावसाने महाबळेश्वर व जावळी तालुक्यांतील स्ट्रॉबेरी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. नव्याने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी पिकात पाणी साठल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. 

महाबळेश्वर व जावळी तालुक्‍यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. काही मोजकेच दिवस पावसाने उसंत दिल्यावर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. काही अंशी लागवड उरकली, तर काहींनी लागवडीसाठी बेड बनवले आहेत. त्यातच जोरदार पावसाने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरी शेतात पाणी तुंबले. तयार केलेले बेड वाहून गेले. त्या शेतीची पुन्हा मशागत करून बेड बनवावे लागणार असल्याने अगोदरची मेहनत वाया गेली आहे. 

स्ट्रॉबेरी लागणीच्या हंगामातच परतीच्या पावसाने उग्ररूप धारण केल्याने लागवड केलेल्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे नव्या स्ट्रॉबेरी रोपांच्या उमलण्यातच ते पाण्यात राहिले. त्यामुळे ते कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याच्या वाढीवर परिणाम होऊन स्ट्रॉबेरी रोपाची मूळ व खोडही पाण्यामुळे कुजू शकण्याची शक्यता आहे. 

महाबळेश्वर तालुक्‍यातील दानवली गावाचे शेतकरी बाजीराव बिरामणे, रवींद्र दानवले, प्रदीप दानवले यांनी आखाडे (ता. जावळी) येथे स्ट्रॉबेरी शेती केली. त्यात पाणी साचले आहे. आगोदरच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले असून, वाटाणा, बटाटा, घेवडा ही पिके पावसाने पूर्णपणे हातची गेली आहेत. त्यातच स्ट्रॉबेरीवर आशा पल्लवित झाल्या होत्या. 

महागाईची रोपे घेऊन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे. सातारा, माण, कोरेगाव तालुक्यांत दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे या तालुक्यातील अनेक ठिकाणची पिके पाण्य़ात आहेत. पाण्यामुळे पिके काढता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com