Agriculture news in marathi Loss of thousands of hectares of crops in Kolhapur district | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात हजारो हेक्टर पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

कोल्हापूर : शहरासह गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणारा पाऊस गुरुवारी (ता.१५) सुरुच होता. पूर्व भागात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर काहिसा ओसरला.

कोल्हापूर : शहरासह गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणारा पाऊस गुरुवारी (ता.१५) सुरुच होता. पूर्व भागात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर काहिसा ओसरला.

सलग पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकाचे प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सातत्याने  पडणाऱ्या पावसामुळे प्रत्येक गावातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील मार्ग बंद पडण्याचे प्रकार घडले. दरम्यान, खरिपाचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

खरीप काढणीच्या वेळीच पाऊस आल्याने विशेष करून भात, सोयाबीन मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  काढणी होणाऱ्या भातात पाणी साचून राहिल्याने आता भात कापणी करणे जवळजवळ अशक्य बनले आहे. परिणामी यंदा खरीप पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

यंदा चांगला पाऊस झाल्याने पिकाची वाढ जोमदार झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता होती. परंतु, ऐन काढणीच्या वेळी संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे यंदा शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी निराश झाले आहेत.

यंदा भाताचे पीक चांगले आले होते भात पाकणी भाताची कापणी करण्याअगोदरच जोरदार वाऱ्यामुळे सत्तर टक्के भाताचे नुकसान झाले आहे
- संपतराव पाटील, मंगरायाचीवाडी 
ता. हातकणंगले, जि कोल्हापूर


इतर बातम्या
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
अमरावतीमधील तीन लाख हेक्‍टरसाठी २१४...अमरावती : संततधार पाऊस, ढगाळ वातावरण, कीडरोगाचा...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
कुक्कुटपालन चांगल्या उत्पन्नाचा व्यवसाय...औरंगाबाद : ‘‘कुक्कुटपालनासाठी जागा, खाद्य,...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...