हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांच्या २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले.
 Loss of three lakh 7 thousand farmers in Hingoli district
Loss of three lakh 7 thousand farmers in Hingoli district

हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांच्या २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ७१८ रुपये निधीची मागणी केली. 

यंदा अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. काही मंडळांत ढगफुटी झाली. ओढे, नाले, तसेच कयाधू नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात शिरले. सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरून नदीकाठच्या पिकांचे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या.

यंदा खरिपात ३ लाख ९६ हजार १७९ हेक्टरवर पेरणी झाली होती. अतिवृष्टीमुळे एकूण ३ लाख ६ हजार ७४७ शेतकऱ्यांच्या २ लाख २६ हजार ७०१ हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात सोयाबीनचे २ लाख ४४९ हेक्टर, कपाशीचे २१ हजार ४३२ हेक्टर, ज्वारी १ हजार ८७८ हेक्टर, मूग १ हजार ४१४ हेक्टर, उडीद १ हजार ५२० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. 

नुकसानीची मदत देण्यासाठी एकूण १५४ कोटी १५ लाख ६७ हजार ८८८ रुपये निधीची मागणी करण्यात आली. बागायती क्षेत्रातील पिकांमध्ये ८७६ शेतकऱ्यांच्या २२५ हेक्टरवरील हळदीचे नुकसान झाले. ३० लाख ४५ हजार ३३० रुपये निधीची मागणी करण्यात आली. एकूण २०७ शेतकऱ्यांच्या १४२ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले. त्यासाठी २५ लाख ६० हजार ५०० रुपये निधीची मागणी करण्यात आली, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पीक नुकसान स्थिती (हेक्टरमध्ये) 

तालुका पेरणी बाधित क्षेत्र शेतकरी अपेक्षित निधी (कोटी रुपये) 
हिंगोली ८२५२५ ३७४६६ ५५२५९ २५.४७
कळमनुरी ७१९०६ ५२०८५ ५९१४७ ३५.५७ 
वसमत ८१८१२ ५००८० ७२३१९ ३४.०५ 
औंढा नागनाथ ६५३७९ ४६१०९ ४७९८६ ३१.४९ 
सेनगाव ९१०३५ ४१३२८ ७३११९ २८.११ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com