Agriculture news in Marathi Loss of tomato growers due to falling prices | Agrowon

दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 एप्रिल 2020

परभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मजुरी, वाहतूक यावर झालेल्या खर्च निघेना झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दर कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये विक्रीसाठी नेणे परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर टोमॅटोचे पीक सोडून द्यायची वेळ आली आहे.

परभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मजुरी, वाहतूक यावर झालेल्या खर्च निघेना झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दर कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये विक्रीसाठी नेणे परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर टोमॅटोचे पीक सोडून द्यायची वेळ आली आहे.

यंदा जिल्ह्यात सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली आहे. गेल्या दोन तीन महिन्यांत जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक वाढली आहे. परभणी येथील भाजीपाला मार्केट टोमॅटोच्या आवकेत वाढली आहे.

गेल्या दोन महिन्यांत प्रतिक्विंटलला सरासरी १५० ते २०० पर्यंत दर कमी झाले आहेत. ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना परभणी येथील मार्केटमध्ये टोमॅटोसह अन्य भाजीपाला विक्रीसाठी आणावा लागत आहे. लॅाकडाऊनमुळे वाहतुकीसाठी अडचणी येत आहे. 

वाहनचालकांनी भाड्यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढल्या आहे. मोरेगाव (ता. सेलू) येथील परमेश्वर कादे यांच्या सव्वा एकर क्षेत्रातील टोमॅटोपासून मार्च महिन्याअखेर पर्यंत ४०० ते ५०० क्रेट (८० ते १०० क्विंटल) टोमॅटोची विक्री झाली. गेल्या काही दिवसांत प्रतिक्रेट ३० ते ४० रुपये पर्यंत घसरण झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...