Agriculture news in Marathi, The loss of vegetable over nine thousand hectares | Agrowon

पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी विभागात सुमारे नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाल्याने काही प्रमाणात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.

पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे विभागात सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यापैकी विभागात सुमारे नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाल्याने काही प्रमाणात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.

पुणे विभागात जोरदार पावसामुळे मेथी, वांगे, पालक, कोथिंबीर, भेंडी, टोमॅटो अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात सांगली जिल्ह्यात एकूण ६५ हजार २६७ हेक्टर, सोलापूर जिल्ह्यात ३६ हजार ३४५ हेक्टर, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८० हेक्टर, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८०० हेक्टर व कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला पिकांचाही समावेश असून, त्यांचे नुकसान झाले आहे.

पुणे विभागात एकूण ५१ तालुके बाधित असून, एकूण एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील काही भागातील गावांना भेटी देत आहेत. मात्र, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होऊन याकडे प्रशासन विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. 

पावसामुळे झालेले नुकसानीचे क्षेत्र कमी दिसत असले, तरी गेल्या महिन्यात झालेल्या सांगली, कोल्हापूर, सातारा भागात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने विभागात झालेले एकूणच दोन महिन्यांत झालेले नुकसानीचे क्षेत्र हे मोठे आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दरात वाढ झाल्याचे दिसून येते.

अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले की, गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या सलग पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बटाटा या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. याशिवाय मेथी, कोथिंबीर, शेपू, भेंडी, वांगे, कारले या पिकांचेही चांगलेच नुकसान झाले. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च वाढला असून मागील काही महिन्यांपासून भाजीपाल्याच्या उत्पन्नात घट झाली आहे.

माझ्याकडे पाच एकर शेती आहे. त्यामध्ये एक एकरावर मिरचीची दोन महिन्यांपूर्वी लागवड केली होती. पावसामुळे या मिरचीचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच उसाचेही मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी उसाचे पंचनामे केले. मात्र, मिरचीचे पंचनामे केले नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी लागणारा आर्थिक खर्चाचे ताळमेळ बसेना.
- प्रल्हाद वरे, शेतकरी, मळद, ता. बारामती, जि. पुणे


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...