ऊर्ध्व पैनगंगा कालव्यातून पाण्याची नासाडी

इसापूर धरणामुळे विहिरींना पाणी आले. ओलिताची सोय झाल्यामुळे आमच्या भागात केळी लागवड वाढली. परंतु कालवा, चाऱ्यांची तूट-फूट झाल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे चाऱ्यांची दुरुस्ती करून सिंचनाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. - ज्ञानेश्वर माटे, शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड.
ऊर्ध्व पैनगंगा कालव्यातून पाण्याची नासाडी
ऊर्ध्व पैनगंगा कालव्यातून पाण्याची नासाडी

नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा धरणाच्या कालव्याद्वारे रब्बी, उन्हाळी हंगामात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु कालव्याच्या वितरण प्रणालीची दुरवस्था, पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारमुळे आवर्तनांचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेनासे झाल्याची स्थिती आहे.

नांदेड, हिंगोली जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळी स्थिती आहे. परंतु इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या धरणात पुरेशा प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे रब्बी, उन्हाळी हंगामात पाणी आवर्तने सोडण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, नांदेड, मुदखेड, उमरी या तालुक्यातील, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यातील शेतक-यांना दुष्काळाच्या झळा फारशा जाणावल्या नाहीत. कालव्याच्या आवर्तनामुळे विहिरी, कूपनलिकांना देखील मुबलक पाणी उपलब्ध होते. यामुळे अर्धापूर, मुदखेड, नांदेड तालुक्यात केळी लागवडदेखील वाढली.

हळद, रब्बीतील गहू, हरभरा, उन्हाळी ज्वारी, भूईमुग, चारा पिकांना पाणी मिळाले. परंतु गेल्या काही वर्षात या प्रकल्पाचा मुख्य कालवा, वितरिका, चाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. झाडेझुडपे वाढली. गाळ जमा झाल्याने चाऱ्या जागोगाजी फुटल्या. अनेक ठिकाणी चाऱ्यांना दरवाजे नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी सोडण्यात आलेल्या आवर्तनाच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. 

वरच्या बाजूचे ओढे, नाले पावसाळ्याप्रमाणे भरून वाहत आहेत. त्यामुळे शेवटच्या टोकाकडील शेतक-यांना योग्य दाबाने, पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. वितरण प्रणालीच्या दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com