agriculture news in Marathi, loss will not occur by sugarcane season extend , Maharashtra | Agrowon

ऊस हंगाम लांबल्याने तोट्याची शक्यता कमी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात कारखानदारांनी गळीत हंगाम पहिल्या टप्प्यात तरी बंद ठेवून गनिमी कावा साधला आहे. सध्या थंडीत वाढ होत असल्याने तोडणीस येणाऱ्या उसास ही थंडी पोषक ठरण्याची शक्‍यता आहे. यामुळे दहा ते पंधरा दिवस ऊस हंगाम जरी लांबला तरी त्याचा तोटा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही, अशी चिन्हे आहेत. 

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात कारखानदारांनी गळीत हंगाम पहिल्या टप्प्यात तरी बंद ठेवून गनिमी कावा साधला आहे. सध्या थंडीत वाढ होत असल्याने तोडणीस येणाऱ्या उसास ही थंडी पोषक ठरण्याची शक्‍यता आहे. यामुळे दहा ते पंधरा दिवस ऊस हंगाम जरी लांबला तरी त्याचा तोटा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही, अशी चिन्हे आहेत. 

शासनाने एक ऑक्‍टोबरपासून ऊस हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले. पण मजुरांची उपलब्धता, शेतकरी संघटनांच्या भूमिका यामुळे राज्यात अपवाद वगळता ऑक्‍टोबरला गळीत हंगाम प्रारंभ करण्यासाठी कारखान्यांनी फारसा उत्साह दाखविला नाही. दसऱ्यानंतर राज्यासह कर्नाटकातील कारखान्यांनी गळितास प्रारंभ केला. ऊस तोडणी कामगारही कारखाना कार्यस्थळावर दाखल झाले. ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक कारखान्यांनी गळितास प्रारंभ केला. परंतू शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या मागणीसाठी हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला.

संघटनांच्या ऊस परिषदा झाल्यानंतर संघटनांनी सुरू असलेली ऊस तोडणी बंद केली. यामुळे कारखान्यांनी ऊस तोडणी स्वत:हून थांबविण्याचा निर्णय घेतला. यानंतर हंगाम लांबेल, अशी चर्चा सुरू झाली. परंतू दुसरीकडे मात्र गेल्या सप्ताहापासून उकाडा कमी होऊन थंडी वाढत आहे. यामुळे दहा ते अकरा महिन्याच्या उसाला हे हवामान सकारात्कम ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

रात्री थंडी व दिवसा ऊबदार असे वातावरण उसाची रिकव्हरी वाढण्यासाठी महत्त्वाचे ठरत असते. यामुळे वजनातही वाढ होत असल्याने सध्या तोडणी बंद असली तरी तातडीने उसाचे नुकसान होइल ही भीती कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.ऊस तोडणी बंद असल्याने जे मजूर लांबून येणार होते ते अद्याप आलेले नाहीत. त्यांना अनेक कारखान्यांनी दिवाळीनंतरच येण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या दिवाळी तोंडावर असल्याने ऊस तोडग्याबाबतच्या चर्चेसाठी कोणीच पुढे आले नाही. तोडणी बंद असल्याने वाहनांचे नुकसान करण्याचाही प्रश्‍न उरला नाही. यामुळे कारखान्यांनीही दिवाळीनंतरच हंगाम सुरू करण्याबाबतची मानसिकता केली आहे. जरी चर्चा सुरू झाली तरी दिवाळीनंतरच हंगाम सुरू होण्याची शक्‍यता काही कारखानदारांनी व्यक्त केली.    

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...