भंडारा जिल्ह्यात २७ लाख क्‍विंटल धान खरेदी

जिल्ह्यात आधारभूत केंद्राच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी होत आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे २७ लाख ७७ हजार ४०२ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे
Purchase of 27 lakh quintals of paddy in Bhandara district
Purchase of 27 lakh quintals of paddy in Bhandara district

भंडारा ः जिल्ह्यात आधारभूत केंद्राच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी होत आहे. त्यानुसार आतापर्यंत सुमारे २७ लाख ७७ हजार ४०२ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १७७ केंद्रांच्या माध्यमातून ही खरेदी झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  या वर्षीच्या खरीप हंगामात धान खरेदीला उशिरा सुरू झाली. गोदाम आणि विविध समस्यांचा सामना करीत जिल्ह्यात १७७ केंद्रे सुरू झाली. या केंद्रावर आतापर्यंत सर्वसाधारण ग्रेडचे २७ लाख ७७ हजार ४०२ क्‍विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. त्यात भंडारा तालुक्‍यात २ लाख ४० हजार ४१५ क्‍विंटल, मोहाडी ३ लाख ५६ हजार ६१६, तुमसर ५ लाख ४८ हजार ६६२, लाखनी २ लाख ८१ हजार ६६३, साकोली ३ लाख ३२ हजार २३६, लाखांदूर ५ लाख ४३ हजार २१९, तर पवनी तालुक्‍यात आतापर्यंत ४ लाख ७४ हजार ३७८ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १९४० रुपये या हमीभावाने ही खरेदी होत आहे. त्यानुसार खरेदी केलेल्या या धानाची किंमत ५३८ कोटी ८१ लाख ६० हजार ५७८ रुपये आहे. 

२८० कोटींचे चुकारे  धान उत्पादक शेतकऱ्यांनी विकलेल्या धानाची खरेदी किंमत ५३८ कोटी ८१ लाख ६० हजार ५७८ रुपये आहे. त्यापैकी २८० कोटी ९ लाख २० हजर ३५७ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. त्यानंतरही २५८ कोटी ७२ लाख ४० हजार २२१ रुपयांचे चुकारे थकीत आहेत. 

बोनसची प्रतीक्षाच  गेल्या हंगामात शेतकऱ्यांना ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये सानुग्रह अनुदान याप्रमाणे ७०० रुपये अतिरिक्‍त देण्यात आले होते. या वर्षी मात्र बोनसची कोणतीच घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. नेत्याकडून मात्र बोनस मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com