खानदेशात हरभऱ्याचे क्षेत्र कमी; पण उत्पादन चांगले

खानदेशात हरभऱ्याचे क्षेत्र कमी; पण उत्पादन चांगले
खानदेशात हरभऱ्याचे क्षेत्र कमी; पण उत्पादन चांगले

जळगाव ः हरभऱ्याची खानदेशात सुमारे पावणेदोन लाख हेक्‍टवर पेरणी अपेक्षित होती, परंतु हरभऱ्याची पेरणी सुमारे एक लाख हेक्‍टरपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. यातच ज्यांनी सिंचनासंबंधी चांगली व्यवस्था केली, त्यांना थंडी टिकून राहिल्याने बऱ्यापैकी उत्पादन मिळेल. दरही सध्या टिकून आहेत, पुढे दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

खानदेशात रब्बीची पेरणी ५३ टक्‍क्‍यांखालीच आहे. धुळे, नंदुरबारमध्ये दुष्काळी स्थिती अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा व मुक्ताईनगर भागात बऱ्यापैकी पेरणी झाली. धुळ्यात शिरपूर, धुळे तालुक्‍यात पेरणी झाली आहे. 

नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात अधिक पेरणी झाली.  जळगावमधील अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, बोदवड, जामनेर व धरणगाव भागात कोरडवाहू हरभरा नसल्याची स्थिती आहे. परंतु जेथे सिंचनाची सुविधा आहेत, त्या तापी व गिरणा नदीकाठच्या भागात हरभऱ्याचे पीक जोमात आहे. सध्या घाटे पक्व झाले आहेत. काही अर्ली पेरणीच्या क्षेत्रात पुढील १० ते १२ दिवसांत कापणी सुरू होईल. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाची व्यवस्था हरभरा पिकासाठी केली. यामुळे सिंचन व्यवस्थित झाल्याने पीक जोमात आहे. अर्ली हरभऱ्याला बऱ्यापैकी दर मिळतील. परंतु पुढे आवक वाढली तर दरांवर दबाव राहू शकतो. यामुळे लवकर कापणी करून लागलीच विक्री करण्याचे नियोजन काही शेतकरी सध्या करीत आहेत. 

संकरित आणि महाबीजच्या वाणांची पेरणी अधिक झाली आहे. एकरी किमान तीन ते साडेचार क्विंटल उत्पादन सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना मिळू शकते, असा अंदाज आहे. मागील हंगामात हरभऱ्याला ३५०० पर्यंतच दर होते. तसेच लिलावही होत नव्हते. यंदा मात्र मागील हंगामासारखी स्थिती नसल्याचे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com