agriculture news in marathi, low cost wine production technique developed by Agharkar Research Institute, Pune | Agrowon

कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित; आघारकरचे संशोधन
अमित गद्रे
सोमवार, 15 जुलै 2019

पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी कमी खर्चाचे वाइननिर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे वाइननिर्मितीसह रॉ वाइन, व्हिनेगर आणि आसव उत्पादनही शक्य होणार आहे. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने ही एक संधी उपलब्ध होईल, अशी माहिती या तंत्रज्ञानाचे विकसक ज्येष्ठ तंत्रज्ञ अरविंद किर्लोस्कर यांनी दिली.

पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी कमी खर्चाचे वाइननिर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे वाइननिर्मितीसह रॉ वाइन, व्हिनेगर आणि आसव उत्पादनही शक्य होणार आहे. ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने ही एक संधी उपलब्ध होईल, अशी माहिती या तंत्रज्ञानाचे विकसक ज्येष्ठ तंत्रज्ञ अरविंद किर्लोस्कर यांनी दिली.

श्री. किर्लोस्कर म्हणाले की, आपल्याकडे द्राक्ष उत्पादक पट्ट्यात गेल्या पंधरा वर्षांत व्यावसायिक वायनरी उभ्या राहिल्या आहेत. यातील गुंतवणूक मोठी आहे. हे लक्षात घेऊन कमी गुंतवणूक आणि लहान स्तरावर वाइननिर्मिती तंत्रज्ञान आघारकर संशोधन संस्थेतील तज्ज्ञांच्या सह्याने आम्ही विकसित केले आहे. 

या तंत्रज्ञानाने उत्पादित वाइनची चव, स्वाद आणि रंग उत्तम आहे. त्यामुळे बाजारपेठेत निश्‍चितपणे यास मागणी राहील. या तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्च कमी होणार आहे. आम्ही या तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. परंतु लघू उद्योजकांसाठी आम्ही हे तंत्रज्ञान कमी खर्चात उपलब्ध करून देत आहोत. हे तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये आघारकर संशोधन संस्थेतील डॉ. सुजाता तेताली, डॉ. प्रसाद कुलकर्णी आणि प्रणव क्षीरसागर यांचा सहभाग आहे. 

संस्थेचे संचालक डॉ. पी. के. ढाकेफळकर म्हणाले, की या तंत्रज्ञानाने वाइन निर्मिती करताना द्राक्षाचे देठ, सालासह उपयोग करण्यात आला आहे. वाइन निर्मितीसाठी आम्ही कॅबरनेट सोविनियो, सोविनियो ब्लॅंक आणि शरद सीडलेस या जातींचा वापर केला. या तंत्रज्ञानाचा फायदा असा आहे की वाइन निर्मितीच्या बरोबरीने आपल्याला द्राक्षापासून रॉ वाइन, व्हिनेगर आणि आसव उत्पादन करणे शक्य होणार आहे. यामध्ये सॅफॉनिन, अल्कलॉइड, फ्लेवोनॉईड घटक आहेत. रॉ वाइन आणि आसवाचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीसाठी होतो. व्हिनेगरचा वापर हा औद्योगिक वापरासाठी होतो. हे नैसर्गिक पद्धतीने उत्पादित व्हिनेगर असल्याने बाजारपेठेत याला चांगली मागणी आहे. 
 ः ०२०-२५६५२९७४
आघारकर संशोधन संस्था, पुणे 

 

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...