मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७ टक्क्यांवर अडलं

मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा करण्यात जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी घेतली असली तरी सर्वाधिक कर्जपुरवठाचे उद्दिष्ट मिळालेल्या व्यापारी बँका कर्जपुरवठा करण्यात कमालीच्या पिछाडीवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करण्याचा घोडं ३७ टक्क्यांवर अडकलेलं आहे.
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७ टक्क्यांवर अडलं
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७ टक्क्यांवर अडलं

औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा करण्यात जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी घेतली असली तरी सर्वाधिक कर्जपुरवठाचे उद्दिष्ट मिळालेल्या व्यापारी बँका कर्जपुरवठा करण्यात कमालीच्या पिछाडीवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करण्याचा घोडं ३७ टक्क्यांवर अडकलेलं आहे. शिवाय कर्जमाफी मिळाल्यानंतरही खरिपाच्या पेरणीपूर्वी वा वेळेत कर्ज मिळण्याची शेतकऱ्यांची आशा पुन्हा एकदा अशाच राहिली आहे. कर्जमाफीच्या निर्णय अंमलबजावणीतील विलंबाचाही फटका शेतकऱ्यांनी बसला आहे.  शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्याचा प्रश्न कायम रेंगाळलेला असतो. त्याची प्रचिती पुन्हा एकदा यंदा खरीप पीक कर्ज पुरवठा करण्याच्या निमित्ताने येते आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ११ हजार ९०४ कोटी ४४ लाख रुपये कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका व ग्रामीण बँकेला देण्यात आले आहे. त्यामध्ये आठही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २१०१ कोटी ६५ लाख ६८ हजार, ग्रामीण बँकेला १६३६ कोटी ७२ लाख ७४ हजार तर व्यापारी बँकांना सर्वाधिक ८ हजार १६६ कोटी ५ लाख ६५ हजार रुपये दिलेल्या कर्जपुरवठ्याची उद्दिष्टाचा समावेश होता.  सुरुवातीच्या अडथळ्यानंतर सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ३ ऑगस्टपर्यंत ८५ टक्के उद्दिष्टपूर्ती करत ५ लाख १९ हजार ७७२ शेतकऱ्यांना १८०३ कोटी ४ लाख ७६ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला. या पाठोपाठ ग्रामीण बँकेने मिळालेल्या उद्दिष्टाची ५८ टक्के पूर्ती करताना १ लाख ३१ हजार ७२४ शेतकऱ्यांना ९६१ कोटी ३२ लाख ६१ हजार रुपयांचा कर्ज पुरवठा केला.तर सर्वाधिक कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट मिळालेल्या व्यापारी बँकांनी मात्र केवळ २०.८६ टक्के उद्दिष्ट गाठत केवळ १ लाख ७४ हजार २२२ शेतकऱ्यांना १७०३ कोटी ६५ लाख ७३ हजार रुपयांचाच कर्ज पुरवठा केला ही वस्तुस्थिती आहे. निम्मा खरीप हंगाम उलटला तरी शेतकऱ्यांना उद्दिष्टानुसार व वेळेत कर्जपुरवठा झालाच नाही हे कर्ज पुरवठ्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.  

जिल्हानिहाय उद्दिष्ट व कर्जपुरवठा(रक्कम कोटीत)

औरंगाबाद जिल्हा 
उद्दिष्ट ११९६ कोटी ८० लाख 
प्रत्यक्ष कर्ज पुरवठा ८०३ कोटी ८० लाख ५७ हजार
टक्केवारी ६७.१६ 
जालना जिल्हा  
उद्दिष्ट १११५ कोटी ३१ लाख ९० हजार 
प्रत्यक्ष कर्जपुरवठा ५३२ कोटी २१ लाख २ हजार 
टक्केवारी ४७.७२ 
परभणी जिल्हा 
उद्दिष्ट १५६७ कोटी २० लाख 
प्रत्यक्ष कर्जपुरवठा ४२७ कोटी ११ लाख ५३ हजार 
टक्केवारी २७.२५ 
हिंगोली जिल्हा 
उद्दिष्ट ११६८ कोटी ९५ लाख
प्रत्यक्ष कर्जपुरवठा २८० कोटी ७७ लाख ६२ हजार 
टक्केवारी २४.०२ 
लातूर जिल्हा 
उद्दिष्ट २२८३ कोटी ९४ लाख
प्रत्यक्ष कर्जपुरवठा १,०३२ कोटी ९९ लाख ८४ हजार टक्केवारी : ४५.२३ 
उस्मानाबाद जिल्हा 
उद्दिष्ट १,५९० कोटी ५५ लाख ४७ हजार 
प्रत्यक्ष कर्जपुरवठा ५५९ कोटी ८९ लाख ७५ हजार 
टक्केवारी ३५.२० 
बीड जिल्हा 
उद्दिष्ट ९५० कोटी 
प्रत्यक्ष कर्जपुरवठा ४३४ कोटी ९३ लाख ४ हजार 
टक्केवारी ४५.७८
नांदेड जिल्हा 
उद्दिष्ट २०३१ कोटी ६७ लाख ७० हजार 
प्रत्यक्ष कर्जपुरवठा ३९६ कोटी २९ लाख ७३ हजार 
टक्केवारी १९.५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com