Agriculture news in marathi, Low-to-moderate rainfall in Pune district | Agrowon

पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची संततधार
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे जिल्हयातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जुन्नरमधील बेल्हे येथे सर्वाधिक ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस रब्बी पेरणीसाठी हा पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे जिल्हयातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जुन्नरमधील बेल्हे येथे सर्वाधिक ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस रब्बी पेरणीसाठी हा पाऊस पोषक असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

परतीचा पाऊस गेल्यानंतरही काही भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे जिल्हयात ढगाळ हवामान तयार झाले आहे. शुक्रवारी (ता.१८) दिवसभर उकाड्यात वाढ झाली होती. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाल्याने ढग जमा झाले. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले. सायंकाळनंतर जिल्हयातील बहुतांशी भागात पाऊस पडण्यास सुरूवात झाली. रात्री जिल्हयातील अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. शनिवारीही (ता.१९) सकाळापासून पावसास सुरूवात झाल्याने दिवसभर संततधार सुरू होती.

हवेली तालुक्यातील पुणे शहर, भोसरी, चिंचवड, वाघोली येथे हलका पाऊस पडला. मुळशी तालुक्यातील बहुतांशी भागात हवामान ढगाळ होते. भोरमधील किकवी येथे १८ मिलिमीटर, भोर, भोलावडे, नसरापूर, वेळू, संगमनेर येथेही पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मावळातील शहरात नऊ मिलिमीटर पाऊस पडला. काळे कॉलनी, कार्ला, लोणावळा, तळेगाव, खडकाळा येथेही हलका पाऊस पडला. वेल्हा तालुक्यात ढगाळ हवामान असले तरी अधूनमधून सरी पडत होत्या.

जुन्नर तालुक्यातील निमगाव येथे ३४ मिलिमीटर पाऊस पडला. नारायणगाव १८, तर ओतूर, आपटाळे, जुन्नर येथे तुरळक सरी पडल्या. खेडमधील कुडे येथे दहा मिलिमीटर पाऊस झाला. वाडा, चाकण, कन्हेरसर, कडूस येथेही हलका पाऊस झाला.

आंबेगावमधील कळंब येथे २७; तर डिंभे येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. घोडेगाव, मंचर येथे हलका पाऊस पडला. शिरूर तालुक्यात वडगाव रसाई येथे ३३; तर शिरूरमध्ये २० मिलिमीटर हजेरी लावली. टाकळी, न्हावरा, पाबळ, बारामतीतील माळेगाव येथे ३१, बारामती २०, वडगाव २६, लोणी भापकर येथे २७ मिलिमीटर पाऊस पडला. सुपा, मोरगाव, उंडवडी येथे हलका पाऊस पडला. 
इंदापुरातील काटी ४५, इंदापूर ४६, लोणी ४०, भिगवण ३१, निमगाव केतकी २६, अंथुर्णे २३, सणसर १६ मिलिमीटर पाऊस पडला. दौडमधील रावणगाव येथे सर्वाधिक ४५ मिलिमीटर पाऊस पडला. 

देऊळगाव राजे २५, पाटस १२, दौंड येथे २५ मिलिमीटर पाऊस पडला. वरंवड, केडगाव, यवत, राहू, पुरंदरमधील परिंचे, कुंभारवळण येथेही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...