Weather Update : मळभ हटले; राज्यात गारठा वाढणार

अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठा कमी झाल्याने राज्यात हवामान कोरडे झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पहाटे धुके पडत आहे. येत्या काळात राज्यातील अनेक भागांत गारठा वाढणार आहे
मळभ हटले; राज्यात गारठा वाढणार
मळभ हटले; राज्यात गारठा वाढणार

पुणे  : अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठा कमी झाल्याने राज्यात हवामान कोरडे झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पहाटे धुके पडत आहे. येत्या काळात राज्यातील अनेक भागांत गारठा वाढणार आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी आठवाजेपर्यंत नाशिक येथील १५.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. राज्यात आजपासून हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे राज्यातील थंडी पुन्हा काही प्रमाणात वाढण्याची आहे. त्यातच अरबी समुद्राच्या पश्‍चिम भाग, महाराष्ट्राची किनारपट्टी व मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. दरम्यान, पुन्हा बंगालच्या उपसागरात आणि बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भाग व श्रीलंकेची किनारपट्टी या भागातही चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीत चढ-उतार राहणार असून, किमान तापमान कमीअधिक स्वरूपात राहणार आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे हवेत गारठा आहे. मात्र काही दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. विदर्भात किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यात ऊन आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. या भागात १६ ते २० अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात १५ ते १८, कोकणात २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. विदर्भात किमान तापमान १६ ते १९ अंश दरम्यान मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः   मुंबई (सांताक्रूझ) २०.८ (२), अलिबाग २१.२ (२), ठाणे २१.८, रत्नागिरी २२.२ (२), डहाणू २१.० (२), पुणे १७.१ (६),  जळगाव १९ (७), कोल्हापूर १९.४ (६), महाबळेश्‍वर १५.४ (२), मालेगाव १८.२ (७), नाशिक १५.४ (५), निफाड १६.८, सातारा १७.६ (२), सोलापूर १८.१ (२), औरंगाबाद १६.६ (५), बीड १८.३ (५), परभणी १९.१ (६), परभणी कृषी विद्यापीठ १६.५, नांदेड २० (७), उस्मानाबाद १६.८ (३), अकोला १९.७ (६), अमरावती २०.५ (५), बुलडाणा १७.२ (३), चंद्रपूर १८.२(५), गोंदिया १८.४ (६), नागपूर १६, वर्धा १९.६ (६), यवतमाळ १८.५ (४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com