Agriculture news in marathi With low production of groundnut Farmers' finances deteriorated | Page 2 ||| Agrowon

भुईमुगाच्या अल्प उत्पादनाने  शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

भुईमुगाचे बोगस बियाणे व पोषक वातावरणाच्या अभावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याने पुसद तालुक्यातील भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा एकदा बिघडले आहे. 

श्रीरामपूर, जि. यवतमाळ : भुईमुगाचे बोगस बियाणे व पोषक वातावरणाच्या अभावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याने पुसद तालुक्यातील भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा एकदा बिघडले आहे. 

खरीप व रब्बी हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुक्यातील नद्या, नाले, विहिरी व पुस धरण ही जलस्रोत पावसाळ्यात तुडुंब भरल्याने खरीप व रब्बीतील नुकसानाची भरून काढण्यासाठी उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती. परंतु मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही भुईमुगाच्या बोगस बियाण्याने दगा दिला असून, पिकाला अपेक्षित असलेले वातावरण नसल्यानेही भुईमूग उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला आहे.

श्रीरामपूर परिसरातील वालतूर रेल्वे येथील शेतकरी लक्ष्मण खंडाळे पाटील यांनी साडेतीन एकर भुईमुगासाठी मशागत खर्च १०,०००, बी-बियाणे व खत खर्च ४१,०००, फवारणी ८,०००, निंदण ७,०००, डवरणी २,०००, पाणी मजुरी ७,००० व काढणी मजुरी १५,००० असा एकूण नव्वद हजार रुपये खर्च केला आहे. सध्या भुईमुग उपटणे सुरू केल्यानंतर भुईमुगाला पाहिजे तशा शेंगा लगडल्या नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मजूर सुद्धा भुईमूग काढणीला येत नसल्याने काढणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तर मिळालेले मजूरही काढणीसाठी अव्वाच्या सव्वा दाम मागत आहेत. 

शेंगा बडवल्यानंतर एकरी अडीच ते तीन क्विंटलच उतारा येत आहे. शेतकऱ्याला साडेतीन एकरात केवळ दहा क्विंटल उत्पादन होईल, असे दिसून येत आहे. उत्पादन खर्च नव्वद हजार तर शेंगाचा दर पाच ते सहा हजार रुपये धरल्यास उत्पन्न केवळ साठ हजार होत असून, तीस हजार रुपयांचा तोटा सहन करावा, लागणार असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण भुईमूग उत्पादकांची झाली असून, निकृष्ट  असलेल्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

खामगावमध्ये भुईमुगाची आवक वाढली
खामगाव, जि. बुलडाणा : जिल्ह्यातील मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव येथे भुईमुगाची आवक दररोज वाढत आहे. सध्या दर चार ते सहा हजारांदरम्यान प्रति क्विंटल मिळत आहे. आठवड्यातील दोन दिवस येथे भुईमुगाची खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.

खामगाव कृषी उत्‍पन्न बाजार समितीमध्ये सोमवार ते गुरुवार धान्‍य तर शुक्रवार व शनिवारी भुईमुगाचे खरेदी विक्रीचे व्‍यवहार करण्यात येतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजार समिती प्रशासनाने कामकाजाचे नियोजन केले आहे. शुक्रवारी (ता. ७) व शनिवारी (ता. ८) केवळ भुईमूग खरेदी-विक्रीचे व्‍यवहार करण्यात आले.

या दोन दिवसांत ३ हजार ७२८ भुईमुगाचे पोते शेतकऱ्यांनी विक्रीस आणले होते. याला ४ हजार ते ६ हजार ४२० रुपये मिळाला. या बाजार समितीत जिल्‍ह्यासह अन्‍य जिल्‍ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीस आणतात. त्यामुळे बाजार समितीत शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापारी यांची गर्दी लक्षात घेता बाजार समितीने चार दिवस धान्‍य व दोन दिवस भुईमुगाच्या खरेदीचे नियोजन केले आहे. शेतकरी, अडते, खरेदीवर व अन्‍य लोकांची गर्दी होऊ 
नये म्‍हणून बाजार समितीने निर्णय घेत सकाळी दहा वाजेपर्यंत 
शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात आहे.


इतर बातम्या
‘रोहयो’तून विहिरी, शेतरस्त्यांची कामे...पांगरी, जि. सोलापूर ः ‘‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार...
सेंद्रिय परसबाग उभारून कुटुंबाची गरज...नाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
‘दुधना’च्या पुरामुळे हजारो हेक्टरवरील...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
परभणी जिल्ह्यात पीक नुकसानीच्या विमा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...