Agriculture news in Marathi Low rainfall forecast in Vidarbha, Marathwada | Page 3 ||| Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाज

शनिवार, 18 सप्टेंबर 2021

१७ ते २३ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक, तर विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस पडला. या पावसाने सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. राज्यात अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली असून, १७ ते २३ सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक, तर विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी चांगल्या पावसाने दिलासा मिळाला. बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन), गुजरात आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, त्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा या प्रणालीपूरक ठरल्याने गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. 

९ ते १५ सप्टेंबर या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत ३५४ टक्के अधिक पाऊस पडला. पालघर जिल्ह्यात ३०६ टक्के अधिक, तसेच नंदूरबार जिल्ह्यात २९६ टक्के, ठाणे जिल्ह्यात २७७ टक्के, गोंदिया जिल्ह्यात २५५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर झालेल्या पावसाने नाशिक, साताऱ्यासह धुळे, नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत २०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला. 

मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोले, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.  मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये आठवडाभरात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजेच उणे ८९ टक्के पाऊस पडला. तसेच बीड जिल्ह्यात उणे ८१ टक्के, जालना उणे ७७ टक्के, उस्मानाबाद उणे ७७ टक्के, औरंगाबाद उणे ३२ टक्के तर नांदेड जिल्ह्यात उणे २० टक्के पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात उणे ४६ तर नगर जिल्ह्यात उणे ३५ टक्के पाऊस पडला. वाशीम, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

चारही विभागांत सर्वदूर पावसाची शक्यता
दुसऱ्या आठवड्यात (२४ ते ३० सप्टेंबर) या काळात राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्रात चारही विभागांमध्ये सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाच्या उघडिपीमुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढउतार होत आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्यात कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २४ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यातही कमाल तापमानाचा पारा २८ ते ३४ अंश, तर किमान तापमान २० ते २४ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...