Agriculture news in marathi Low rate to urid in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात उडदाला नीचांकी दर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

जळगाव : एकीकडे उडदाचे मोठे नुकसान अतिपावसात झाले आहे. दुसरीकडे उडदाचे दर मळणी सुरू असतानाच पाडण्यात आले आहेत.

जळगाव : एकीकडे उडदाचे मोठे नुकसान अतिपावसात झाले आहे. दुसरीकडे उडदाचे दर मळणी सुरू असतानाच पाडण्यात आले आहेत.  १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर जळगाव, अमळनेर, चोपडा येथील बाजारात सांगितला जात आहे. बाजारात आवक नगण्य आहे. परंतु जशी आवक वाढेल, तशी खरेदीदारांकडून अल्प दरात खरेदी सुरू होईल. मंदीचे कारण सांगून जळगाव बाजार समितीत इतर धान्याची खरेदी केली जात आहे.

जळगाव बाजार समिती जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. परंतु, या बाजार समितीत कुठलेही लिलाव होत नाहीत. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी इतर भागात जावे लागत आहे. या बाजार समितीमधील अडतदार, खरेदीदार सध्या नियमनमुक्तीचा लाभ घेत असून, थेट लातूर, जालना, बुलडाणा, औरंगाबाद भागातील मोठ्या खरेदीदारांकडून शेतमालाची खरेदी करून  घेत आहेत.

बाजार समितीबाहेर हे व्यवहार सुरू आहे. खरेदीनंतर थेट डाळ मिला किंवा प्रक्रिया उद्योगात उडीद, मूग पाठविला जात आहे. किरकोळ व्यापार, व्यवहार बाजार समितीत करायचाच नाही, असा पवित्रा किंवा भूमिका काही अडतदारांनी घेतली आहे. नुकसान होत आहे. मंदी आहे, अशी कारणे खरेदीदार सांगत आहेत. एका शेतकऱ्याची ज्वारी व बाजरी मागील तीन महिन्यांपासून एका अडतदाराकडे तशीच पडून आहे. तिचा लिलावही झालेला नाही. अडतदार मनमानी कारभार करीत असून, शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला शेतमाल घरी परत घेवून जावा लागत आहे.

बाजरीची खरेदी अडतदार करीत नाहीत. बाजरीचे दरही १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कुणी खरेदीच करीत नाही. आम्ही कशाला त्याचा साठा करू, अशी बतावणी अडतदार, किरकोळ व्यापारी करीत आहेत. यामुळे शेतकरी बाजार समितीमध्ये नाडला जात आहे. याबाबत कुणीही आवाज उठवायला तयार नाही. अडतदारांची मनमानी आता खरीप हंगाम संपत असताना पुन्हा सुरू झाली असून, मूग, उडदाचे दर पाडले आहेत. 

मुगाला २५०० ते ७००० रूपये दर

मुगाचे दर जळगाव बाजार समितीत २५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर, उडदाचे दरही १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दर्जा खराब असल्याचे कारण अडतदार सांगत आहेत. या आठवड्यात उडदाची काही अडतदारांकडे आवक झाली. परंतु त्याचा लिलाव जळगाव बाजार समितीत झाला नाही.

यावल, जळगाव भागातील काही शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी चोपडा, अमळनेर भागात घेवून जात आहेत. तेथेही दर कमी आहेत. या आठवड्यात उडदाची सरासरी प्रतिदिन पाच हजार क्विंटल आवक जळगाव, चोपडा व अमळनेर येथील बाजारात झाली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...