लाख मोलाच्या मासळीला सिंधुदुर्गात कवडीमोल भाव

लाख मोलाच्या मासळीला सिंधुदुर्गात कवडीमोल भाव
लाख मोलाच्या मासळीला सिंधुदुर्गात कवडीमोल भाव

मालवण : सिंधुदुर्गातील समुद्रात सापडणाऱ्या काही स्थानिक बाजारात अत्यल्प मागणी असलेल्या माशांना परदेशात मात्र चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे; मात्र निर्यात यंत्रणेअभावी लाखमोलाचे हे मासे कवडीमोल दराने विकले जात आहेत.  जिल्ह्याच्या समुद्रात मच्छीमारांना सुरमई, सरंगा, पापलेटसह अन्य प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळते. या मासळीला स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणांहूनही मोठी मागणी असते. त्यामुळे या मासळीला चांगला दर मिळतो; मात्र येथील समुद्रात स्थानिक बाजारपेठेत कमी मागणी असणारी मासळीही मिळते. यात स्थानिक भाषेत "ताडूसा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांचे सर्वाधिक प्रमाण आहे. या मासळीचे तोंड तलवारीसारखे असल्याने तिला "सोअर्ड फिश' असे म्हटले जाते.

स्थानिक भाषेतील "बुगडी' मासळीला "ट्युना फिश' म्हणून ओळखले जाते. सुरमई मासळीशी साधर्म्य साधणारा मासा म्हणून या माशाची स्थानिक पातळीवर ओळख आहे. पण, परदेशात ट्युना फिशच्या कॅचसाठी खास बनावटीच्या नौकांचा वापर केला जातो. ही मासळी परदेशी बाजारपेठेत सर्वाधिक पसंतीची मानली जाते. येथील समुद्रात मासा सापडतो त्याला स्थानिक भाषेत "हापुनसा' म्हणजेच "यलो ट्युना फिश' ओळखले जाते; मात्र या माशांना स्थानिक व नजीकच्या बाजारपेठेत खूपच कमी मागणी असते. त्यामुळे मोठ्या मेहनतीने पकडलेल्या या मासळीचा स्थानिक मच्छीमारांना फारच अल्प मोबदला मिळतो. 

निर्यात व्यवस्था नसल्याने हे मासे अल्प दरात स्थानिक मच्छीमारांना विकावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या या मासळीसाठी जर निर्यात व्यवस्था झाल्यास त्याचा फायदा मच्छीमारांना होऊ शकतो. त्यादृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत.  - विकी चोपडेकर,  मच्छीमार व्यावसायिक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com