agriculture news in marathi, low rates for quality fish in sindhudurg | Agrowon

लाख मोलाच्या मासळीला सिंधुदुर्गात कवडीमोल भाव
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

मालवण : सिंधुदुर्गातील समुद्रात सापडणाऱ्या काही स्थानिक बाजारात अत्यल्प मागणी असलेल्या माशांना परदेशात मात्र चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे; मात्र निर्यात यंत्रणेअभावी लाखमोलाचे हे मासे कवडीमोल दराने विकले जात आहेत. 

मालवण : सिंधुदुर्गातील समुद्रात सापडणाऱ्या काही स्थानिक बाजारात अत्यल्प मागणी असलेल्या माशांना परदेशात मात्र चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे; मात्र निर्यात यंत्रणेअभावी लाखमोलाचे हे मासे कवडीमोल दराने विकले जात आहेत. 

जिल्ह्याच्या समुद्रात मच्छीमारांना सुरमई, सरंगा, पापलेटसह अन्य प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात मिळते. या मासळीला स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणांहूनही मोठी मागणी असते. त्यामुळे या मासळीला चांगला दर मिळतो; मात्र येथील समुद्रात स्थानिक बाजारपेठेत कमी मागणी असणारी मासळीही मिळते. यात स्थानिक भाषेत "ताडूसा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांचे सर्वाधिक प्रमाण आहे. या मासळीचे तोंड तलवारीसारखे असल्याने तिला "सोअर्ड फिश' असे म्हटले जाते.

स्थानिक भाषेतील "बुगडी' मासळीला "ट्युना फिश' म्हणून ओळखले जाते. सुरमई मासळीशी साधर्म्य साधणारा मासा म्हणून या माशाची स्थानिक पातळीवर ओळख आहे. पण, परदेशात ट्युना फिशच्या कॅचसाठी खास बनावटीच्या नौकांचा वापर केला जातो. ही मासळी परदेशी बाजारपेठेत सर्वाधिक पसंतीची मानली जाते. येथील समुद्रात मासा सापडतो त्याला स्थानिक भाषेत "हापुनसा' म्हणजेच "यलो ट्युना फिश' ओळखले जाते; मात्र या माशांना स्थानिक व नजीकच्या बाजारपेठेत खूपच कमी मागणी असते. त्यामुळे मोठ्या मेहनतीने पकडलेल्या या मासळीचा स्थानिक मच्छीमारांना फारच अल्प मोबदला मिळतो. 

निर्यात व्यवस्था नसल्याने हे मासे अल्प दरात स्थानिक मच्छीमारांना विकावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या या मासळीसाठी जर निर्यात व्यवस्था झाल्यास त्याचा फायदा मच्छीमारांना होऊ शकतो. त्यादृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. 
- विकी चोपडेकर,
 मच्छीमार व्यावसायिक 

इतर बातम्या
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
बुलडाणा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पीक...बुलडाणा ः वऱ्हाडात आजवरची स्थिती पाहली तर...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
नांदेड जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ....नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या...
रस्त्यालगत हरितपट्ट्यांमध्ये मानवी...इंग्लंड आणि वेल्समध्ये दरवर्षी सुमारे ५ लाख...
वादळी वाऱ्याने भोपळा, कारल्याचे मांडव...नाशिक : जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी...