Agriculture news in marathi, Low response of farmers to e-crop survey in Khandesh | Agrowon

खानदेशात ई पीक पाहणीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

जळगाव : खानदेशातील सुमारे तीन हजार पाडे, महसुली गावांपैकी निम्मेदेखील गावांनी ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. परिणामी, सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदी झालेल्या नाहीत.

जळगाव : खानदेशातील सुमारे तीन हजार पाडे, महसुली गावांपैकी निम्मेदेखील गावांनी ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. परिणामी, सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदी झालेल्या नाहीत. या कार्यक्रमातून पीक पेरा नोंदीसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. मोठे क्षेत्र पीक पेरा नोंदीअभावी पडीक दिसत आहे. 

१५ ऑगस्टपर्यंत पीक पेरा नोंदी केल्या जात होत्या. परंतु यंदा ई पीक पाहणी या अॅण्ड्रॉईड मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या पीक पेऱ्याची नोंद ऑनलाइन करायची आहे. एका मोबाईलच्या मदतीने २० खात्यांवरील पीक पेरा नोंद शक्य आहे. परंतु तांत्रिक अडचणी, उदासीनता व शासनाबाबत नाराजी, यामुळे अनेक शेतकरी या ई पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत.

ई पीक पाहणी अॅप डाऊनलोड करणेच अनेक शेतकरी टाळत आहे. निरक्षर शेतकरी पीक पेरा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात जात आहेत. परंतु तलाठीद्वारे पीक पेरा नोंदणीसंबंधीची कार्यवाहीच पोर्टलवर होत नसल्याची स्थिती आहे. या मुळे या कार्यक्रमाचा फज्जाच जणू झाला आहे. 

मोठे क्षेत्र नापेर किंवा पीक पेऱ्याविना दिसत आहे. जमिनी पडीक दिसत आहेत. यामुळे यंदा पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे करणे प्रशासन टाळत असल्याचे दिसत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे या तलाठीद्वारे पीक पेरा नोंदी सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे १५०० महसुली गावे आहेत. पैकी ५०० गावेदेखील या कार्यक्रमात १०० टक्के सहभागी झालेले नाहीत. काही गावांमधून, तर एकाही शेतकऱ्याने पीक पेऱ्याची नोंदणी ई पीक पाहणी कार्यक्रमातून केलेली नसल्याचेदेखील वास्तव समोर आले आहे. यामुळे हा कार्यक्रम अपयशी झाला आहे. जमिनी पोर्टलवर पडीक दिसत आहेत. ऑक्टोबरमध्ये रब्बी हंगाम सुरू होईल. 

शेतकरी नैसर्गिक समस्येमुळे संकटात आहेत. त्यात ई पीक पाहणी, अॅप, मोबाईल या बाबी शेतकऱ्याला परवडणाऱ्या नाहीत. तलाठी पीक पेरा का नोंदवीत नाही, हा प्रश्न आहे. ई पीक पाहणी सुरू ठेवा, पण तलाठ्यालादेखील पीक पेरा नोंदीचे अधिकार पोर्टलवर बहाल करा.
- रामभाऊ मराठे, शेतकरी, जामनेर (जि.जळगाव)


इतर बातम्या
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला...पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे...