agriculture news in marathi, Low response to government procurement | Agrowon

जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला अल्प प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय कडधान्य खरेदीसह तृणधान्य खरेदीला हवा तसा प्रतिसाद अजूनही नाही. सोयाबीनची शून्य क्विंटल आवक झाली आहे. उडीद, मूग खरेदीच्या तीन केंद्रांवर मुगाची मिळून सुमारे १५०० क्विंटलही आवक झालेली नसल्याची माहिती मिळाली.

जळगाव ः जिल्ह्यात शासकीय कडधान्य खरेदीसह तृणधान्य खरेदीला हवा तसा प्रतिसाद अजूनही नाही. सोयाबीनची शून्य क्विंटल आवक झाली आहे. उडीद, मूग खरेदीच्या तीन केंद्रांवर मुगाची मिळून सुमारे १५०० क्विंटलही आवक झालेली नसल्याची माहिती मिळाली.

उडदाची खरेदीही सर्वत्र मिळून १४०० क्विंटलही नाही. उडीद व मुगाची आवक सध्या नसल्याच्या स्थितीत आहे. पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे उडीद, मूग व सोयाबीनची खरेदी सुरू आहे. ज्वारी व मक्‍याची खरेदी मागील महिन्याच्या मध्यात सुरू झाली. ही खरेदी अजून हवी तशी नाही. नोंदणीला बरा प्रतिसाद मिळाला होता. परंतु नोंदणी केलेल्या सर्वच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रात ज्वारी व मक्‍याची विक्री केलेली नसल्याचे सांगण्यात आले. कारण ज्यांनी विक्री केली, त्यातील कमाल शेतकऱ्यांचे चुकारे रखडले आहेत.

यामुळे रोखीने पैशांसाठी अनेक शेतकऱ्यांनी बाजार समित्यांमध्ये ज्वारी व मक्‍याची विक्री केली आहे. यामुळे शासकीय खरेदी केंद्रात शुकशुकाट आहे. ज्वारी व मका खरेदीसंबंधी मागील महिन्याच्या मध्यापर्यंत फक्त सहा केंद्र सुरू होते. १६ केंद्रांना मंजुरी दिली आहे. परंतु खरेदीला हवा तसा प्रतिसाद नसल्याने आणि गोदामे उपलब्ध न झाल्याने मागील महिन्यापर्यंत पूर्ण १६ खरेदी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत. अमळनेर, रावेर व इतर चार केंद्रांमध्येच ज्वारी व मक्‍याची खरेदी होऊ शकली.

तूर खरेदीची नोंदणी सुरू करा
तूर खरेदीसंबंधी शासनाने तातडीने नोंदणी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तुरीला बाजारात ५००० रुपयांपर्यंतचे देखील दर नाहीत. दर कमी असल्याने शासकीय खरेदी सुरू करावी लागेल. तूर मळणीस आणखी एक महिना अवधी आहे. मळणीनंतर लागलीच शेतकरी तुरीची विक्री करतील. त्यापूर्वीच नोंदणी करून खरेदीची तयारी केली तर शेतकऱ्यांना कमी दरात तुरीची विक्री करावी लागणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...