agriculture news in marathi, Low seed availability in Pune district | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यात धीम्यागतीने बियाणांचा पुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

पुणे : गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या बियाणे कंपन्याकडून धीम्यागतीने बियाणांचा पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक दुकांनात बियाणांना पुरवठा झाला नसल्याची माहिती असून, ऐन खरिपाच्या तोंडावर बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊन, नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अाहे.  

पुणे : गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या बियाणे कंपन्याकडून धीम्यागतीने बियाणांचा पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक दुकांनात बियाणांना पुरवठा झाला नसल्याची माहिती असून, ऐन खरिपाच्या तोंडावर बियाण्यांचा तुटवडा निर्माण होऊन, नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अाहे.  

यंदा पुणे जिल्ह्यात दोन लाख ३० हजार ८२६ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे खरिपाचे क्षेत्र वाढण्याचे अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने २६ हजार ६८७ क्विटंल बियाणांची मागणी नोंदविली आहे. यामध्ये खासगी कंपन्या, सार्वजनिक विभाग आणि महाबीजकडून बियाणांचा पुरवठा सुरू आहे. सध्या अवघा ११ हजार ६०० क्विंटल म्हणजेच ४४ टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे. यामध्ये सोयाबीन, ज्वारी, मका, मूग, उडीद, भात या बियांणाचा समावेश आहे. 

खरिपात तृणधान्याची खरीप भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका या पिकांची पेरणी शेतकरी करतात. कडधान्यामध्ये तूर, मगू, उडीद, तर गळीतधान्यामध्ये भूईमूग, खरीप तीळ, कारळा, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांची शेतकरी पेरणी करतात. गेल्या वर्षी भाताची ५९ हजार ४४५ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामध्ये यंदा पाच हजार ३५५ हेक्टरने वाढ होणार आहे. भातापाठोपाठ यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बियाणांचा वेळेवर पुरवठा होण्याची गरज आहे. सध्या भाताचे ४०-५० टक्के, तर सोयाबीनचा अत्यल्प बियाणांचा पुरवठा झाला असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

पिकनिहाय बियाणांचा झालेल पुरवठा  ः (क्विटंलमध्ये) : खरीप ज्वारी २०, संकरित बाजरी ५२८, सुधारित बाजरी २३२, भात ७१५१, मका २५५, तूर ४०, मूग ८२, उडीद ३९, भूईमूग ८२, सूर्यफूल ६, सोयाबीन ३२२७, हिरवळीचे २० 

इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...