जळगाव जिल्ह्यात युरियाचा कमी पुरवठा

जळगाव ः जिल्ह्यात नव्या म्हणजेच २०२०-२१ च्या खरिपासाठी रासायनिक खतांचा पुरवठा मागील महिनाभरापासून रखडत सुरू आहे. युरियाचा कमी पुरवठा झाला आहे. मे महिन्यात फक्त १० हजार मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे.
 Low supply of urea in Jalgaon district
Low supply of urea in Jalgaon district

जळगाव  ः जिल्ह्यात नव्या म्हणजेच २०२०-२१ च्या खरिपासाठी रासायनिक खतांचा पुरवठा मागील महिनाभरापासून रखडत सुरू आहे. युरियाचा कमी पुरवठा झाला आहे. मे महिन्यात फक्त १० हजार मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे.

सुरवातीला पुरवठादार कंपन्यांची गोदामे व इतर भागात साठवणूक बऱ्यापैकी झाली. नव्या हंगामात अडचण येणार नाही, असा दावा कृषी विभागातील सूत्रांनी केला. परंतु, मे महिन्यात पुरवठा रखडत सुरू झाला. आता पेरणी सुरू आहे. युरिया, फॉस्फेटची मागणी आहे. परंतु, शेतकऱ्यांना हवा तेवढा युरिया मिळत नसल्याची स्थिती आहे. 

जिल्ह्यात खरिपासाठी तीन लाख २० हजार मेट्रिक विविध रासायनिक खतांचा कंपन्यांतर्फे पुरवठा होणार आहे. यातील ९५ ते ९८ टक्के खतांचा पुरवठा रेल्वे रॅकद्वारे होईल. रेल्वेची मालवाहतूक व्यवस्था मार्च, एप्रिलमध्ये बऱ्यापैकी सुरू असल्याने हा खतपुरवठा सुरळीत झाला आहे. नंतर रेल्वेकडून पुरवठा कमी झाला. रस्त्यांमार्गे रासायनिक खते पोचविण्याचीदेखील खत कंपन्यांनी तयारी केली. परंतु, रस्ते मार्गे पुरवठा परवडणारा नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. 

मागील एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच युरियाचे दोन रॅक दाखल झाले. याद्वारे सुमारे १२ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक युरिया दाखल झाला. मे महिन्यात तीन कंपन्यांकडून सुमारे १४ हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला. तर, या महिन्यातही दोनदा सुमारे ५४०० मेट्रिक टन युरिया दाखल झाला आहे. युरिया पुरवठ्याची टक्केवारी ५० पर्यंतच आहे. 

संयुक्त खतांची मागणी कमी आहे. संयुक्त खतांचे रॅकही दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता.१)  सुपर फॉस्फेट, पोटॅश, डीएपीचा मिळून २८ हजार मेट्रिक टनांवर पुरवठा झाल्याचे सांगण्यात आले.

मंजूर खतपुरवठा  (पुरवठा मेट्रिक टनांमध्ये) 

युरिया १११७२० 
सुपर फॉस्फेट ६२७३० 
पोटॅश   ६०००० 
डीएपी १२६९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com