शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
बातम्या
मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर विक्रीचा पेच कायम
बुलडाणा जिल्ह्यात ४७,५०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही खरेदी या आठवड्यात पूर्ण केली जाणार असून, पुन्हा मका शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन परवानगी दिल्याने शेतकऱ्यांकडील संपूर्ण मका खरेदी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ज्या जिल्ह्यात दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका शिल्लक होता, त्या जिल्ह्याला अवघे २५ टक्के म्हणजे ४७,५०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही खरेदी या आठवड्यात पूर्ण केली जाणार असून, पुन्हा मका शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४० हजार क्विंटल मका खरेदी झाला होता. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनाने खरेदी थांबवली तेव्हा जिल्ह्यात आणखी दोन ते अडीच लाख क्विंटल मका शिल्लक असल्याची माहिती समोर आली होती. बुलडाणा जिल्ह्यात मका विक्रीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३ हजार ७८८ शेतकऱ्यांचाच आजवर मका खरेदी होऊ शकला होता.
त्यानंतर साडेसहा हजारांवर नोंदणी केलेले शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. नव्याने खरेदीचे आदेश दिले असून, पूर्वीच्या केंद्रावर खरेदी करण्यास सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्यांदा परवानगी देताना बुलडाणा जिल्ह्याला ४७ हजार ५०० क्विंटल मका खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली. या मर्यादेमुळे नोंदणी केलेले संपूर्ण शेतकरी आपला मका विकू शकतील का, या बाबत शंका उपस्थित होत आहेत.
शासनाचा हमीभाव १ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल असल्याने व खुल्या बाजारात एवढा दर नसल्याने शेतकरी शासकीय खरेदीसाठी थांबलेले आहेत. नवीन खरेदी प्रक्रियेत सर्वांना मका विकणे शक्य नसल्याने कमी भावात खुल्या बाजारात विकण्याशिवाय आता त्यांच्यापुढे पर्याय राहिलेला नाही. खासगी बाजारपेठेत मका अवघा १ हजार २०० रुपयांच्या आत विकत आहे. हमीभाव व बाजारातील दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांपेक्षा तफावत आहे. क्विंटलमागे शेतकऱ्यांना हे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी मर्यादा शिथिल करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
जिल्ह्यातील मका पिकावर दृष्टीक्षेप
- मका विक्रीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी
- आजवर ३ हजार ७८८ शेतकऱ्यांचा मका खरेदी
- पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४० हजार क्विंटल मका खरेदी
- जिल्ह्यात आणखी दोन ते अडीच लाख क्विंटल मका शिल्लक
- जिल्ह्याला ४७ हजार ५०० क्विंटल मका खरेदीची मर्यादा
- शासनाचा हमीभाव १ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल
- खासगी बाजारपेठेत मका १ हजार २०० रुपयांने विक्री
- 1 of 1536
- ››