Agriculture news in marathi Low target for maize purchase, Sales in front of farmers remain | Agrowon

मका खरेदीचे कमी उद्दिष्ट, शेतकऱ्यांसमोर विक्रीचा पेच कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

बुलडाणा जिल्ह्यात ४७,५०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही खरेदी या आठवड्यात पूर्ण केली जाणार असून, पुन्हा मका शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

बुलडाणा : मका खरेदीसाठी शासनाने नवे उद्दिष्ट देऊन परवानगी दिल्याने शेतकऱ्यांकडील संपूर्ण मका खरेदी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ज्या जिल्ह्यात दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक मका शिल्लक होता, त्या जिल्ह्याला अवघे २५ टक्के म्हणजे ४७,५०० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही खरेदी या आठवड्यात पूर्ण केली जाणार असून, पुन्हा मका शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४० हजार क्विंटल मका खरेदी झाला होता. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनाने खरेदी थांबवली तेव्हा जिल्ह्यात आणखी दोन ते अडीच लाख क्विंटल मका शिल्लक असल्याची माहिती समोर आली होती. बुलडाणा जिल्ह्यात मका विक्रीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३ हजार ७८८ शेतकऱ्यांचाच आजवर मका खरेदी होऊ शकला होता.

त्यानंतर साडेसहा हजारांवर नोंदणी केलेले शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. नव्याने खरेदीचे आदेश दिले असून, पूर्वीच्या केंद्रावर खरेदी करण्यास सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्यांदा परवानगी देताना बुलडाणा जिल्ह्याला ४७ हजार ५०० क्विंटल मका खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली. या मर्यादेमुळे नोंदणी केलेले संपूर्ण शेतकरी आपला मका विकू शकतील का, या बाबत शंका उपस्थित होत आहेत. 

शासनाचा हमीभाव १ हजार ८५० रुपये प्रतिक्‍विंटल असल्याने व खुल्या बाजारात एवढा दर नसल्याने शेतकरी शासकीय खरेदीसाठी थांबलेले आहेत. नवीन खरेदी प्रक्रियेत सर्वांना मका विकणे शक्य नसल्याने कमी भावात खुल्या बाजारात विकण्याशिवाय आता त्यांच्यापुढे पर्याय राहिलेला नाही. खासगी बाजारपेठेत मका अवघा १ हजार २०० रुपयांच्या आत विकत आहे. हमीभाव व बाजारातील दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांपेक्षा तफावत आहे. क्विंटलमागे शेतकऱ्यांना हे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे खरेदी मर्यादा शिथिल करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

जिल्ह्यातील मका पिकावर दृष्टीक्षेप

  •    मका विक्रीसाठी ११ हजार ३३१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी
  •    आजवर ३ हजार ७८८ शेतकऱ्यांचा मका खरेदी
  •    पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ४० हजार क्विंटल मका खरेदी
  •    जिल्ह्यात आणखी दोन ते अडीच लाख क्विंटल मका शिल्लक
  •    जिल्ह्याला ४७ हजार ५०० क्विंटल मका खरेदीची मर्यादा
  •    शासनाचा हमीभाव १ हजार ८५० रुपये प्रतिक्‍विंटल
  •   खासगी बाजारपेठेत मका १ हजार २०० रुपयांने विक्री

इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...