agriculture news in Marathi, low temperature in Mahabaleshwar, Maharashtra | Agrowon

महाबळेश्वरमध्ये हिमकणांची चादर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018

महाबळेश्‍वर येथील हवामान केंद्रामध्ये १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या किमान सरासरी तापमानापेक्षा ते ४ अंशांनी कमी आहे. महाबळेश्‍वर हे दऱ्याखोऱ्यांनी आणि जंगलांनी व्यापलेला प्रदेश आहे. पाणी असलेल्या ठिकाणी तापमान कमी होणे शक्य आहे. मात्र तीन अंशांपर्यंत तापमान कमी झाल्याची नोंद हवामान विभागाकडे नाही.
- डाॅ. के. एस. होसळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, विभागीय हवामान केंद्र, मुंबई. 

महाबळेश्वर, जि. सातारा  ः राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अल्हाददायक वातावरण अनुभवावयास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात शुक्रवारी (ता. २३) पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरी शुभ्र चादर शेतशिवारसह स्ट्रॉबेरी मळ्यामध्ये पाहावयास मिळाली. या परिसरात ४ ते ५ अंश डिग्री पारा खाली उतरला होता.

महाबळेश्वर येथे गेल्या काही दिवसांपासून सकाळ व रात्रीचे वातावरण अत्यंत अाल्हाददायक होते. शुक्रवारी (ता. २३) सकाळी तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात पहाटे प्रचंड थंडी होती. तेथील तापमान ४-५ अंश डिग्रीपर्यंत खाली उतरले होते. त्यामुळे सर्वत्र या परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत, पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पांघरल्याचे पहावयास मिळाले.

हिवाळ्यात अशा प्रकारे हिमकण पहावयास मिळत असतात, मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसले आहेत. या वर्षी थंडीच्या मोसमामध्ये या नंदनवनात अनेक वेळा कडाक्‍याची थंडी पडली होती.

मात्र त्या वेळेस जोरात वारेही होते, त्यामुळे हिमकण पहावयास मिळाले नाहीत. मात्र आज ऐन उन्हाळ्यात सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वर शहराचे किमान तापमान सुमारे १०.० डिग्री सेल्सिअस होते, तर वेण्णा तलाव परिसरात ते ४ ते ५ अंश डिग्रीपेक्षा कमी असल्याचे जाणवत होते. दरम्यान ४ मार्च २०१५ रोजी व मागील वर्षी १३ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच अशा प्रकाचे हिमकण महाबळेश्वरमध्ये पहावयास मिळाले होते.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...