साताऱ्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा

साताऱ्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा
साताऱ्यातील धरणांमध्ये कमी पाणीसाठा

सातारा ः जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. तारळी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व प्रमुख धरणांत गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. वीजनिर्मितीत महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणाने तळ गाठला असून या धरणात गतवर्षीच्या तुलनेत १३.१५ टीएमसी कमी पाणीसाठा झाला आहे. या कमी पाण्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. 

दुष्काळी तालुक्यासह सर्वच तालुक्यांत पावसाची वक्रदृष्टी झाल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भीषण होत गेली. यामुळे पाण्यासाठी टँकरच्या संख्येत वाढ होऊन अडीशेवर संख्या गेली आहे. नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई भासू लागल्याने अनेक धरणांतील पाणी दुष्काळी तालुक्यात सोडावे लागले असल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. वीजनिर्मिती तसेच जलसिंचनासाठी कोयना धरण महत्त्वाचे आहे. या धरणात गतवर्षी २३.२० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. 

या वर्षी या धरणात १०.०५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत या धरणात १३.१५ टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे. वीजनिर्मितीसह कर्नाटक राज्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याने पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यात सध्या उरमोडी धरणातून पाणी सोडले जात आहे. या धरणात गतवर्षी तुलनेत ३.६२ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. 

धोम धरणातही तशीच परिस्थिती असून, या धरणात १.७३ टीएमसी कमी पाणीसाठा आहे. तसेच धोम-बलकवडी धरणात ०.४३ टीएमसी, कण्हेर धरणात ०.३८ टीएमसी, तारळी धरणात मात्र काही प्रमाणात जास्त पाणीसाठा ०.९७२ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. 

सध्या कोयना धरणात १०.०४, धोम धरणात १.३८, उरमोडीत ८.९४, कण्हेरमध्ये १५.७३, धोम-बलकवडीत ३.५८, तारळी धरणात ३२.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मान्सून हजेरी लवकर नाही झाली, तर धरणातील पाणीसाठा घट होणार असल्याने भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com