Agriculture news in marathi Lower Dudhana dam water behavior since Wednesday | Agrowon

निम्न दुधानाचे बुधवारपासून आवर्तन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

 निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणातून यंदाच्या (२०२०-२१) यंदाच्या रब्बी हंगामात तीन पाणी आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पीक नियोजन करावे. पहिले आवर्तन बुधवार (ता. २) ते मंगळवार (ता. १५) या कालावधीत सोडण्यात येणार आहे.

परभणी  : जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणातून यंदाच्या (२०२०-२१) यंदाच्या रब्बी हंगामात तीन पाणी आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पीक नियोजन करावे. पहिले आवर्तन बुधवार (ता. २) ते मंगळवार (ता. १५) या कालावधीत सोडण्यात येणार आहे. लाभक्षेत्रातील गरजू पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन माजलगाव कालवा विभाग क्रमांक दहा, परभणी, जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा निम्न दुधना प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नुकत्याच जिल्हाधिकारी कार्यालयात द्रकश्राव्य  माध्यमाद्वारे  पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या शासकीय सदस्यांच्या प्राथमिक बैठकीतील निर्देशानुसार तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन निम्न दुधना प्रकल्पातून प्रत्यक्षात पहिले आवर्तन बुधवारपासून (ता.२) सोडण्यात येईल. इतर पाणी आवर्तनांचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या मुख्य बैठकीमधील  निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल.

अटी, शर्थीचे पालन करण्याचे आवाहन
पहिल्या आवर्तनामध्ये डावा, उजवा कालवा, शासकीय उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी सोडण्यात येईल. लाभधारकांनी शक्य असेल तेथे प्रवाही पद्धतीने किंवा उपशाद्वारे  पाणी घ्यावयाचे आहे. त्यासाठी गरजू लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज (नमुना ७ अ) मध्ये पीक क्षेत्राची नोंद करून परिपूर्ण अर्ज तत्काळ माजगाव कालवा क्रमांक १० अंतर्गंत संबंधित उपविभागांत सादर करावेत. त्या ठिकाणी पाणी मागणी अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत. कालवा बंद, कालवा सुरू कालावधी यामध्ये बदल करण्याचे  अधिकार कार्यकारी अभियंता यांना आहेत.

मागणी केलेल्या लाभधारक शेतकऱ्यांना चालू हंगामात कालव्याचे पाणी घेतलेल्या पिकाची पाणी पट्टी भरावी लागले. पिकांचे मागणी क्षेत्र २० गुंठेच्या पटीत असावे. मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी (कालवा, नदी, नाले) पाणी अर्ज मंजूर करून घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणीवापर करावा. अर्जासोबत सिंचन परवानगीची प्रत जोडावी. जलाशय उपसा शासकीय मंजूर उपसा योजनांमधूनच करण्यात यावा. पाणी वाया घालवू नये, असे आवाहन ही विभागाकडून करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
स्थानिक वाण, प्रक्रिया पदार्थांना हवे ‘...स्थानिक वाण अधिक उत्पादनक्षम नसले, तरी त्यातील...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...