निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवक

यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस पडत असल्याने निम्न दुधना प्रकल्पात सहा दिवसांत तब्बल सात दलघमी पाण्याची आवक झाली. जून महिन्यातच पाण्याची आवक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवक In the lower milk project Increased water inflow
निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवक In the lower milk project Increased water inflow

परतूर, जि. जालना : यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस पडत असल्याने निम्न दुधना प्रकल्पात सहा दिवसांत तब्बल सात दलघमी पाण्याची आवक झाली. जून महिन्यातच पाण्याची आवक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाणी येते. ८ जूनपासून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास सहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दुधना प्रकल्पात पाण्याची वेगाने आवक होत आहे. गतवर्षी ऑटोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार वर्षांनंतर प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यानंतर रब्बी पिकांना तीन पाणी पाळ्या देण्यात आल्या. उन्हाळी पिकांना दोन्ही कालव्यातून पाणी सोडले होते. दुधना नदीकाठावरील गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदी पत्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठावरील ५० गावांची तहान भागली होती. दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून परभणी जिल्ह्यातील सेलू जालना जिल्ह्यातील परतूर, मंठासह शेकडो गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे प्रकल्पाच्या पाण्यावर जालना व परभणी जिल्ह्यातील शेकडो गावांची मदार आहे. दरम्यान, दर वर्षी सप्टेंबर व ऑटोबर महिन्यात प्रकल्पाची आवक होते. मात्र प्रथमच जून महिन्यात ७ दिवसांत ७ दलघमी पाणी आल्याने यंदाही प्रकल्प शंभर टक्के भरले, अशी आशा व्यक्त केली जात आहे.  गतवर्षी निम्न दुधना प्रकल्प शंभर टक्के जलसाठा निर्माण झाला होता. रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी देण्यात आले. त्याच बरोबर पाणी टंचाई झालेल्या गावांना देखील पाणी देण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचा साठा निम्यावर आला होता. जून महिन्यात पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.  सद्य:स्थितीत प्रकल्पात २३२.४८९ दलघमी एकूण जलसाठा आहे. त्यात १२९.८८९ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे.  

प्रतिक्रिया परिसरात यंदा उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर असल्याने निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन देखील वाढेल. धरण यंदा शंभर टक्के भरल्यावर शेतकऱ्यांची चिता मिटेल. शिवाजी टेकाळे,  शेतकरी, ब्राह्मवडगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com