Agriculture news in marathi In the lower milk project Increased water inflow | Page 2 ||| Agrowon

निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवक

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस पडत असल्याने निम्न दुधना प्रकल्पात सहा दिवसांत तब्बल सात दलघमी पाण्याची आवक झाली. जून महिन्यातच पाण्याची आवक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
 

परतूर, जि. जालना : यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस पडत असल्याने निम्न दुधना प्रकल्पात सहा दिवसांत तब्बल सात दलघमी पाण्याची आवक झाली. जून महिन्यातच पाण्याची आवक झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाणी येते. ८ जूनपासून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास सहा दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे दुधना प्रकल्पात पाण्याची वेगाने आवक होत आहे. गतवर्षी ऑटोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार वर्षांनंतर प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यानंतर रब्बी पिकांना तीन पाणी पाळ्या देण्यात आल्या. उन्हाळी पिकांना दोन्ही कालव्यातून पाणी सोडले होते.

दुधना नदीकाठावरील गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदी पत्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठावरील ५० गावांची तहान भागली होती. दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून परभणी जिल्ह्यातील सेलू जालना जिल्ह्यातील परतूर, मंठासह शेकडो गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे प्रकल्पाच्या पाण्यावर जालना व परभणी जिल्ह्यातील शेकडो गावांची मदार आहे.

दरम्यान, दर वर्षी सप्टेंबर व ऑटोबर महिन्यात प्रकल्पाची आवक होते. मात्र प्रथमच जून महिन्यात ७ दिवसांत ७ दलघमी पाणी आल्याने यंदाही प्रकल्प शंभर टक्के भरले, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

गतवर्षी निम्न दुधना प्रकल्प शंभर टक्के जलसाठा निर्माण झाला होता. रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी देण्यात आले. त्याच बरोबर पाणी टंचाई झालेल्या गावांना देखील पाणी देण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाचा साठा निम्यावर आला होता. जून महिन्यात पाण्याची आवक सुरू झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. 
सद्य:स्थितीत प्रकल्पात २३२.४८९ दलघमी एकूण जलसाठा आहे. त्यात १२९.८८९ दलघमी जीवंत पाणीसाठा आहे.
 

प्रतिक्रिया
परिसरात यंदा उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर असल्याने निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन देखील वाढेल. धरण यंदा शंभर टक्के भरल्यावर शेतकऱ्यांची चिता मिटेल.
शिवाजी टेकाळे, शेतकरी, ब्राह्मवडगाव


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...