Lucerne
Lucerne

हिरव्या चाऱ्यासाठी लुसर्न

लुसर्न पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० सेंमी ठेवावे. हिरव्या चाऱ्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात.

लुसर्न पिकाची पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० सेंमी ठेवावे. हिरव्या चाऱ्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात. लुसर्न पिकापासून जनावरांना वर्षभर कोवळा, लुसलुशीत, हिरवा चारा मिळतो. हा चारा दिसावयास मेथीसारखा असल्यामुळे याला मेथी घास या नावाने ओळखले जाते. याची लागवड करताना बियाणे शुद्ध असावे. हा चारा अत्यंत पोषक असल्यामुळे जनावारांच्या दूध उत्पादनात वाढ होते.

  • शेळ्या हा चारा आवडीने खातात. हिरव्या चाऱ्यात २० टक्के कच्ची प्रथिने , ७२ टक्के पचनीय पदार्थ, २५ टक्के तंतुमय पदार्थ असतात. १.५ टक्के हे कॅल्शिअम, ०.२ टक्के फॉस्फरस आणि जीवनसत्त्व अ, ब, असते.
  • पाण्याचा व्यवस्थित निचरा असणारी जमीन असावी. कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, व कमी उष्ण वातावरण तसेच थंड हवामानही चांगले मानवते.
  • लागवडीपूर्वी २ ते ३ वेळा वखरणीकरून चांगल्या प्रकारचे वाफे तयार करावेत. वाफे हे समतल प्रमाणात असावेत.
  • हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी २५ किलो बियाणे लागते.
  • साधारणपणे पेरणी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणीचे अंतर ३० सेंमी ठेवावे. काही ठिकाणी याची पेरणी बियाणे फोकून करतात.
  • लागवडीसाठी आर.एल-८८, सिरसा-९, आनंद-२ या सुधारित जातींची लागवड करावी.
  • जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. प्रती हेक्टरी ५० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.
  • पिकाची वरचेवर खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
  • पिकाला १५ ते २० दिवसांनी पहिले पाणी देणे गरजेचे आहे. त्यानंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • पिकाच्या पेरणीनंतर ३० दिवसांमध्ये तणाचे व्यवस्थापन करावे. याकरिता १ ते २ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
  • हिरव्या चाऱ्यासाठी पीक ५० ते ६० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या ३५ ते ४० दिवसांनी कराव्यात.
  • पूर्ण हंगामामध्ये हिरव्या चाऱ्याचे उत्पादनासाठी २.५ महिन्यांनी पहिली कापणी करावी. त्यानंतरच्या कापण्या १.५ महिन्यांनी कराव्यात. हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन हे १००० ते १२०० क्विंटल मिळते.
  • संपर्क ः के. एल.जगताप,९८८१५३४१४७ (कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि.बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com